‘बिग बॉस’च्या १४ व्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री पवित्रा पुनिया आणि एजाज खान एकमेकांना शोमध्ये भेटले. शोमध्ये असताना दोघांमध्ये खूप भांडणं झाली, पण नंतर हळूहळू हे भांडण प्रेमात बदललं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. रिलेशनशिपच्या दोन वर्षांनंतर त्यांचा ब्रेकअप झाला. जितकी यांच्या अफेअरची चर्चा झाली तितकाच त्यांच्या ब्रेकअपचाही सर्वाना धक्का बसला. यावर्षीच्या सुरुवातीलाच पवित्राने ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं. विचारांमध्ये मतभेद असल्याचं कारण तिने तेव्हा दिलं होतं. पण आता पवित्राने वेगळाच खुलासा केला आहे. (Pavitra Punia on her breakup)
नुकतीच पवित्रा पुनियाने ‘टेली मसाला’ या मीडिया पोर्टलशी संवाद साधला. ज्यामध्ये तिने एजाज खानपासून विभक्त होण्याबाबत म्हटले की, “आमचे ब्रेकअप धर्मामुळे झाले नाही. मी कोणताही हिंदू-मुस्लिम वादविवाद करत नाही, परंतु प्रत्येक व्यक्तीने त्याच्या धर्माशी एकनिष्ठ असले पाहिजे. माझा असा विश्वास आहे की, मुस्लिम मुलीने हिंदू घरात लग्न केले तरी हिंदूने तिला धर्म बदलायला भाग पाडू नये.तसेच कोणत्याही मुस्लिमाला हिंदू मुलीचे धर्मांतर करण्याचा अधिकार नाही”.
आणखी वाचा – “मी तुझीच आहे आणि…”, नवऱ्याच्या वाढदिवसाला जिनिलीया देशमुखची रोमँटिक पोस्ट, शेअर केले Unseen Photos
यापुढे ती असं म्हणाली की, “आमच्या नात्यात बऱ्याच दिवसांपासून समस्या होत्या. बऱ्याच वेळा मी सर्वकाही नीट करण्याचा प्रयत्नदेखील केला. मात्र जेव्हा मी केलेल्या सर्व प्रयत्नांतून काहीच उपाय निघाला नाही आणि पाणी डोक्यावरून गेले. तेव्हा मी त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला”. एजाजकडून धर्मांतराचा दबाव होत असल्याने पवित्राने ब्रेकअप केल्याची जोरदार चर्चा होती. त्यावरही तिने स्पष्टीकरण दिलं आहे.
याबद्दल ती म्हणाली की, “माझ्या कुटुंबीयांनी माझी खूप साथ दिली. या इंडस्ट्रीत जात-पात, धर्म यांना कोणतीच जागा नसल्याचं त्यांना माहीत आहे. मी एजाजला आधीच स्पष्ट केलं होतं की मी माझा धर्म बदलणार नाही. जर एखादी व्यक्ती त्याच्या धर्माशी प्रामाणिक राहत नसेल तर ती तुमच्याशी कशी प्रामाणिक राहील?”, असं ती पुढे म्हणाली. पवित्राबरोबरच्या ब्रेकअपबद्दल अद्याप एजाजने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.