‘ये रिश्ता क्या कहलात है’ ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. यामध्ये अक्षराची भूमिका हिना खानने साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. अनेक वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. काही वर्षांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र अजूनही ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. हिना त्यानंतर अनेक मालिकांमधून विविध भूमिका करताना दिसून आली. ‘बिग बॉस’च्या ११ व्या पर्वातदेखील छाप पाडली आहे. मात्र अशातच तिच्या स्तनाच्या कर्करोगाची बातमी समोर आल्यानंतर तिचा चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (hina khan instagram post)
हिना आता सध्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. नुकतीच तिने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली आहे. सध्या ती उपचार घेत असून यावेळी तिला किती त्रास होत आहे याची कल्पना दिली आहे. परंतु आता तिला कर्करोगाची भीती वाटत असल्याचेही तिने सांगितले आहे. ही पोस्ट शेअर करत तिने ‘अ विंडो टू माय जर्नी’ असे टायटल दिले आहे.

हिनाने लिहिले आहे की, “हे अशा सर्व धाडसी माहिलांसाठी व पुरुषांसाठी आहे जे त्यांची लढाई लढत आहेत. मला वाटतं की माझा प्रवास प्रेरणादायी असावा ज्यामुळे लोक त्यांच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरु करु शकतील. तसेच या आजाराची भीती वाटू शकते पण घाबरायचं नाही हे देखील लक्षात ठेवतील”.
सोशल मीडियावर ही पोस्ट करुन जे त्यांच्या आयुष्यात ही लढाई लढत आहेत त्यांना जगण्याची व सर्व सहन करण्यासाठी प्रेरणा दिली आहे. तसेच या रोगाची भीती न बाळगता त्याला धैर्याने सामोरे जावे असेदेखील तिने संगीतले. हिनाने २८ जून रोजी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून स्टेज ३ चा स्तनाचा कर्करोग झाल्याचे सांगितले होते. तसेच ठीक असून लवकर बरी होणार असल्याचेही आश्वासन तिने दिले होते. धीराने या सगळ्याला समोरे जाणार असल्याचे सांगितले होते. याबरोबरच हिनाने चाहत्यांना व पापाराजींना प्रायव्हसी बाळगण्याची विनंती केली आहे.