प्रत्येकाची काहीं ना काहीतरी स्वप्न असतात जी पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते. पाहिलेली स्वप्न पूर्ण होण्याचा आनंद सुद्धा काही निराळाच असतो. असच एक खूप दिवसांपूर्वीच स्वप्न पूर्ण झालय अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच. भाग्य दिले तू मला या मालिकेत सानिया हे भूमिका साकारणारी अभिनेत्री जान्हवीचं आई एकविरेच दर्शन घेण्याचं स्वप्न नुकतंच पूर्ण झालंय. या स्वप्नपूर्तीचा एक व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून पोस्ट केला आहे.(Jahnavi Killekar)
भाग्य दिले तू मला या मालिकेत जान्हवी साकारत असलेलं सानिया हे पात्र नकारात्मक असून देखील प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे मालिकेत जान्हवी साकारत असलेलं पात्र नकारात्मक असलं तरीही तिच्या भूमिकेला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.
राज कावेरी , रत्नमाला यांच्या आयुष्यात सानियाने अनेक संकट निर्माण केली आहेत. तिच्या सोबतीला आता वैदेही देखील पाहायला मिळते. रत्नमाला यांची प्रॉपर्टी मिळवल्यानंतर देखील सानिया काही शांत बसायला तयार नाही. राज कावेरीला त्रास देण्याची एकही संधी सानियाने आता पर्यंत सोडलेली नाही.(Jahnavi Killekar)
आता पुढे मालिकेत कोणतं नवीन वळण येणार? सानियाचा राज कावेरीला त्रास देण्यासाठी कोणता नवीन प्लॅन असणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.