batman val kilmer Death : ‘बॅटमॅन’ फेम हॉलिवूड अभिनेता वैल किल्मर याचे वयाच्या ६५व्या वर्षी निधन झाले. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, अभिनेत्याच्या मृत्यूची त्यांची मुलगी मर्सिडीज किल्मर यांनी अधिकृत माहिती दिली आहे. अभिनेता न्यूमोनिया या आजाराने ग्रस्त होता. त्याने लॉस एंजेलिसमध्ये अखेरचा श्वास घेतला. कॅलिफोर्नियामध्ये जन्मलेल्या वैल किल्मर यांनी अभिनय स्कूल ज्युलियर्डकडून अभिनयाचे धडे घेतले. १९९०च्या दशकात तो हॉलिवूडमधील सर्वात प्रमुख कलाकारांपैकी एक होता. २०१४ मध्ये त्याला घशाचा कर्करोग झाला मात्र या आजारातून तो बरा झाला होता.
वैलच्या चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीकडे पाहता तो ‘बॅटमॅन’ आणि ‘द डोर्स’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जायचा. तो त्याच्या लांब केसांसाठी आणि खास लूकसाठी ओळखला जायचा. वैल किल्मरने १९८४च्या ‘टॉप सिक्रेट’ या चित्रपटासह अभिनयाच्या जगात प्रवेश केला. विनोदी चित्रपटांमध्ये चमकदारपणे अभिनय करुन त्याने चित्रपटाच्या जगात एक चांगले स्थान मिळवले.
अभिनेत्याने ‘टॉप सीक्रेट’, ‘रियल जीनियस’ याचबरोबर ऍक्शन चित्रपट ‘टॉप गन’ और ‘विलो’, ‘द घोस्ट एंड द डार्कनेस’, ‘द सेंट’, ‘द प्रिंस ऑफ इजिप्ट’, ‘अलेक्जेंडर’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. यापूर्वी तो ‘रिअल जीनियस’ या विनोदी कार्यक्रमातही दिसला होता. १९८६च्या हिट ‘टॉप गन’ मध्ये त्याला अभिनेता टॉम क्रूझचा सह-कलाकार म्हणूनही ओळख मिळाली.
१९९५ मध्ये किल्मर ‘बैटमैन फॉरेवर’मुळे विशेष चर्चेत आला. २०२२ मध्ये ‘टॉप गन: मेवरिक’ मध्ये अभिनेता टॉम क्रूझसमवेत शेवटचा दिसला. वैल त्याच्या लांब केसांसाठी ओळखला जात असे आणि या लूकमध्ये तो रॉकस्टारसारखा दिसत आहे. विनोदी चित्रपटांमध्ये अभिनय करुन त्याने उद्योग क्षेत्रात स्वतःचा असा ठसा उमटविला. ‘टॉप सीक्रेट!’, ‘रियल जीनियस’ (१९८५)सह त्याने ‘टॉप गन’ (१९८६) आणि ‘विलो’ (१९८८) या चित्रपटातून प्रेक्षकांची मन जिंकली.