Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide : आपल्या अप्रतिम व भव्यदिव्य सेट्समुळे ज्यांनी हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली, ते सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून आत्महत्येनंतर त्यांचे कुटुंबीय व संपूर्ण कलाजगतावर शोककळा पसरली आहे. (Nitin Desai Suicide)
आत्महत्येपूर्वी नितीन देसाई हे एका प्रोजेक्टच्या निमित्ताने दोन दिवसांपासून त्यांच्या एन.डी. स्टुडिओमध्ये मुक्कामी होते. तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधत तिथे सुरु असलेल्या कामाची माहितीही त्यांनी घेतली होती. मात्र आज अचानक नितीन देसाई हे कोणाच्याही फोनला उत्तर देत नसल्याने तिथल्या कर्मचाऱ्यांनी एन.डी. स्टुडिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवले. तेव्हा नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचं समोर आलं. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमागचं कारण समोर आले नसून पोलीस या घटनेची संपूर्ण चौकशी करत आहे.

दरम्यान, कला दिग्दर्शक नितीन देसाई हे आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. ते इंस्टाग्रामवर एन.डी. स्टुडिओतील अनेक फोटोज व व्हिडिओस पोस्ट करत असायचे. विशेष म्हणजे, नुकतंच नितीन देसाई यांनी प्रसिद्ध अश्या लालबागचा राजाच्या देखाव्याचे डिझाईनसुद्धा केली असल्याची माहिती दिली होती.
ही आहे नितीन देसाईंची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट (Nitin Desai last instagram post)
नितीन देसाई यांनी १९४२ : ए लव्हस्टोरी, देवदास, लगान, जोधा अकबर, राजा शिवछत्रपती अश्या अनेक हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांचे भव्यदिव्य सेट्स उभारले असून त्या सर्व चित्रपटांचे सेट्स शेअर करताना त्यांनी त्या चित्रपटातील अनेक आठवणी जागवल्या. १६ जुलैला त्यांनी ‘१९४२ : ए लव्हस्टोरी’ या चित्रपटाला २९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. ज्यात त्यांनी या चित्रपटाचा पोस्टर आणि चित्रपटाच्या सेटचे काही फोटोज शेअर केली होती. तर पोस्टवरील कॅप्शनमध्ये नितीन देसाई लिहितात, “The story of your favorite love story has completed 29 years ????” नितीन देसाई यांची ही शेवटची इंस्टाग्राम पोस्ट ठरली असून नेटकरी त्यांच्या या पोस्टवर श्रद्धांजली वाहताना दिसत आहे. (Nitin Desai last instagram post)
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी सलग चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेले असून त्यांनी साकारलेल्या अनेक चित्रपटांचे भव्यदिव्य सेट्सने प्रेक्षक पडद्यावर भारावून जायचे. (Nitin Desai Suicide)