‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अमोलच्या आग्रहाखातर अर्जुन अप्पी एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. तर इकडे आर्या नवनवीन डाव आखते. अर्जुनसमोर येताना साधेपणाचा आव आणत तू अमोलबरोबर वेळ घालवायला हवा आणि तू त्याला वेळ द्यायला हवा असंही सांगते. अर्जुनला वाटते की आपल्यासाठी आर्या किती करत आहे. त्यानंतर ते दोघं आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खायला जातात. तेव्हा आर्या म्हणते की, अर्जुनच्या मनात नक्की काय चाललंय हे मला समजून घ्यायला हवं म्हणून ती अर्जुनला विचारते की, अप्पीला तुझ्या बदललेल्या आवडी निवडीबद्दल सांगितले आहेस का?, तू तिथे तुझे हाल करुन घेऊ नकोस. (Appi Amchi Collector Serial Update)
यावर अर्जुन सांगतो की, अजूनतरी मला तसं काही वाटत नाही. आपला साखरपुडा झाल्यानंतर माझ्या मनात अप्पीबद्दल तसं काहीच नाही आहे. त्यानंतर अर्जुन व अप्पी दोघेही घरी येतात. तर इकडे अमोल त्यांची वाट पाहत असतो. त्यानंतर दोघांनाही अमोल सरप्राईज देत रुममध्ये घेऊन जातो आणि फोटो दाखवत सांगतो की आपण तिघे एकाच रुममध्ये राहणार आहोत. हे ऐकल्यावर अर्जुन अप्पीला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर अमोल अजून एक सरप्राईज आहे असं सांगत बाहेर जातो. तेव्हा अर्जुन व अप्पी एकमेकांशी बोलतात. अर्जुन अमोलपर्यंत ही गोष्ट पोचली कशी?, आपल्याला काही करुन अमोलशी बोलावं लागेल असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा तो असंही म्हणतो की, आपण फक्त अमोलसाठी एकत्र आलो आहोत या पलीकडे आपल्यात काहीच नाही हे अमोलला सांगायला हवं नाहीतर त्याच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत जातील.
आणखी वाचा – दिशाचा डाव तिच्यावरच उलटला, अहिल्यादेवींनी केली कानउघडणी अन्…; पारूने आदित्यला वाचवलं
हे सगळं काही अमोल ऐकतो. तेव्हा अमोल त्यांना विचारतो, तुमचं एकमेकांवर प्रेम नाही आहे का?, त्यानंतर ते दोघे अमोलला समजवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा अमोल सांगतो की, सगळ्यांचे आई-बाबा हे एकत्र राहतात न भांडता राहतात. मात्र माझ्या बाबतीत असं घडणं कधी शक्य नाही का?, असा प्रश्न तो करतो. यावर अर्जुन व अमोल सांगतात की, तुला आमच्यामुळे कसलाच त्रास होणार नाही. आम्ही दोघं तुझ्यासाठी असू आणि कायम तुझ्याबरोबर असू हे ऐकल्यावर अमोलही खुश होतो.
आता अमोल दोघांना एकत्र आणण्यासाठी कोणता तरी मोठा नवीन प्लॅन आखायला हवा असं सुचवतो. तर इकडे आर्या रूपाली वहिनींचा फायदा घेत त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करते. आता अर्जुन व अप्पी एकत्र येणार का?, हे सर्व पाहणे मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.