‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अप्पी व अर्जुनला एकत्र आणण्यासाठी अमोल प्रयत्न करत असतो. मात्र डेट प्लॅनचा प्लॅन त्याचा फ्लॉप गेलेला असतो, यामुळे तो थोडासा नाराज असतो. एकीकडे रूपालीही अप्पीच्या घरी राहायला आल्यानं अमोल व अर्जुन एकत्र येणार नाहीत याकडे तिचं अगदी योग्य पद्धतीने लक्ष असतं. अप्पीच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते की रूपालीमुळे तिला आणि अमोलला त्रास होणार आहे. आणि याबाबत ती अर्जुनकडे बोलूनही दाखवते. मात्र अर्जुन या सगळ्याचा दोष अप्पीला देतो. भूतकाळात झालेल्या चुका या विसरु शकत नाही त्यामुळे तुला ऐकून घ्यावंच लागेल असेही तो सांगतो. तेव्हा तिथे अमोल येतो. अमोल दोघांनाही गोष्ट सांगायला सांगतो आणि तो झोपून जातो. (Appi Amchi Collector Serial Update)
सकाळी उठल्यावर अमोल विचार करत असतो की आता पुढचा प्लॅन नेमका काय करायचा आहे. त्यावेळेला दीपेशच्या शर्टाचा बटन तुटलेलं असतं आणि मोमो शर्टाच बटन लावून देते. तर इकडे अमोलही अर्जुनचा एक शर्ट बेडवर ठेवतो आणि त्याचं बटन तोडतो. ते शर्ट घातल्यावर अर्जुन म्हणतो, याचा बटन तुटलं आहे. त्यामुळे मी ते घालू शकत नाही तेव्हा अर्जुन सांगतो थांब मी माँला पाठवतो. ती लगेच तुझा प्रॉब्लेम सॉल करेल असं म्हणत अप्पीला बोलवायला जातो. तर रूपाली अमोलचा हा डाव ओळखते आणि अमोलला दुसरा शर्ट मी नवीन आणला आहे तो सारखाच आहे असं सांगत शर्ट द्यायला निघून जाते. त्यामुळे अमोलचा पुन्हा हिरमोड होतो.
दीपेशच्या हे लक्षात येतं तेव्हा दीपेश सांगतो की, रूपाली वहिनींनाच आपण अद्दल शिकवायला हवी. मात्र अमोल नाही असं सांगतो. ती माझी काकी आहे त्यामुळे त्यांना काही झालं नाही पाहिजे. पण तिलासुद्धा या प्लॅनमध्ये घेऊन आपण मोठा प्लॅन करू असं तो सांगतो. तर इकडे अर्जुन ऑफिसमध्ये असताना ड्रग केसची फाईल कलेक्टर ऑफिसला मॅडमला द्यायची असते म्हणून तो तिथून निघून येतो. अपर्णा आणि गायतोंडे बोलत असतात तेव्हा अपर्णा बोलते की, अमोल अर्जुन आणि मी एकत्र यावे म्हणून खूप धडपड करत आहे आणि हे माझ्या लक्षात येत आहे पण मी काहीच करु शकत नाही.
यावर गायतोंडे त्यांना सल्ला देतो की, तुम्ही दोघांनी अमोलसाठी तरी एकत्र यायला हवं. तुम्ही तिघांनी कुठेतरी फिरायला जा म्हणजे अमोललाही तुम्हाला वेळ देता येईल आणि तुम्हाला एकमेकांचा सहवास लागेल. तितक्यात तिथे अर्जुन येतो. अर्जुन आता अमोलला व अप्पीला घेऊन बाहेर फिरायला जाणार का?, की रूपाली यातही कोणता नवा प्लॅन आखणार हे पाहणं रंजक ठरेल.