‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अमोलने अप्पी व अर्जुन एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. अमोल दीपेश आणि त्याच्या दोन्ही आजोबांच्या मदतीने अप्पी व अर्जुनसाठी डेटही प्लॅन करतो. खूप सजावट करत धावपळ करत अखेर त्यांनी डेट प्लॅन पूर्ण केलेली असते. अर्जुन व अप्पी ऑफिसमधून आल्यावर अमोल त्यांना सरप्राईज डेट प्लॅन दाखवतो आणि हे पाहून अर्जुन व अप्पीला धक्का बसतो. दोघंही सगळ्यांच्या आग्रहाखातर जेवायला बसतात. तितक्यात रूपाली तिथे येते आणि सगळ्यांना थांबा असं म्हणते. (Appi Amchi Collector Serial Update)
त्यानंतर रूपालीला पाहून अर्जुन विचारतो तुम्ही इथे?, यावर रूपाली म्हणते, मी इथे नसायला हवे होते का?, तुमचं आता लग्न होणार आहे. लग्नाची बायको असताना तुम्ही इथं तिच्याबरोबर डेट प्लॅन करताय हे किती योग्य आहे?, यावर आर्या मुद्दाम अर्जुनच्या मनात आपली जागा निर्माण करण्यासाठी सोज्ज्वळपणाचा आव आणत सांगते की, अर्जुन हे सगळं अमोलसाठी करत आहे. त्यामुळे माझी याबद्दल काहीच तक्रार नाही किंवा यासाठी माझा काहीच आक्षेप नाही. अमोलसाठी अर्जुनने मत द्यायला हवं हे माझंच मत आहे आणि आताही तो अमोलसाठीच ही डेट प्लॅन करत आहे असं म्हणते. यानंतर आर्या निघून जात असते तेव्हा अमोल तिला जेवून जायला सांगतो. त्यानंतर सगळेचजण तिला जेवून जायला सांगतात. तेव्हा आर्या म्हणते की, मी एका अटीवर जेवन करेन की आपण सगळे एकत्र जेवण करायचं.
हे ऐकल्यावर अमोलचा हिरमोड होतो. अमोल म्हणतो हे सगळं मी माझ्या माँ आणि बाबासाठी केलं आहे. मात्र अप्पी व अर्जुन त्याला समजावतात आणि सगळेजण एकत्र जेवण करतात. जेवण केल्यानंतर आर्या घरी जायला निघते तेव्हा अर्जुन तिला सोडायला बाहेर जातो. तर रूपालीला मोना अर्जुन व अप्पीची रुम दाखवते. रूममधील एकत्र सगळ्यांचे फोटो पाहून रूपालीला धक्का बसतो. रूपाली म्हणते मी इथे आले नसते तर सगळं हाताबाहेर गेलं असतं. आता हे दोघे एकत्र कसे येतात हेच मी इथे राहून पाहते, असं म्हणते. तर मोना तिला साथ देते. तर इकडे अमोल रडका चेहरा करुन बसलेला असतो.
तेव्हा दीपेश तिथे येतो आणि अमोलला समजावतो. अमोलला तो सांगतो की, आता तू तुझ्या आई बाबांना डेटला तर पाठवणार आहेस ना तिकडे कदाचित ते दोघे एकत्रच असतील त्यामुळे तू चिंता करु नकोस. आता मालिकेच्या पुढील भागात रूपाली कोणता नवा प्लॅन आखणार की अमोलच्या नव्या प्लॅनवर पाणी फेरणार हे सगळं पाहणं रंजक ठरेल.