‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अप्पी आणि अमोल बोलत असतात तेव्हा अप्पी अर्जुनबरोबरचे जुने फोटो पाहत आठवणीत रमलेली असते. तेव्हा अमोल अप्पीला विचारतो की, माँ तू काय करत आहेस, तेव्हा ती सांगते की, मी तुझ्या बाबांचे जुने फोटो पाहत आहे. यावर अमोल सांगतो की, मला सुद्धा असंच वाटतंय की, तू आणि बाबा एकत्र यावं पण बाबांना असं वाटत नाही आहे. यावर अप्पी अमोलची समजूत काढते आणि सांगते की, मला सुद्धा तुझ्या बाबांबरोबर राहायचं आहे पण तो गेला भूतकाळ विसरायला तयारच नाही आहे. (Appi Amchi Collector Serial Update)
यावर अमोल सांगतो की, आपण यातून काहीतरी मार्ग काढूया तू काहीच काळजी करु नकोस. तेव्हा अप्पीही अमोलला साथ देते आणि सांगते की, मी आजपासून तुझ्या या प्लॅनमध्ये सहभागी झाले आहे त्यामुळे बाबा आपल्यामुळे कसा खुश राहील आणि तो आपल्याकडेच राहील यासाठी आपण प्रयत्न सुरु करुयात आणि दोघेही रूपालीला न दुखावता तिचं प्रेम मिळवण्यासाठीही प्रयत्न करतात. तर अप्पी सांगते की, कोणाच्या मनात शिरण्यासाठी पोटातून शिरायचं असतं. मी आज मस्तपैकी पाणीपुरीचा बेत करते. अर्जुनला पाणीपुरी खूप आवडते. तर इकडे अप्पी पाणीपुरीचा बेत करते त्यानंतर अर्जुन तयार होऊन येतो.
तितक्यातच तिथं आर्याही येते. आर्याला पाहून अमोलचा चेहरा उतरूनच जातो. तर रूपाली मुद्दाम पाणीपुरी आर्याला खायचाही आग्रह करते आणि आर्याला पाणीपुरी दिल्यावर आर्याही पाणीपुरी अर्जुनला भरवते. हे पाहून तर अमोलचा आणखीनच हिरमोड होतो. तर अप्पी ही गोंधळल्यासारखी होते. दोघंही पाणीपुरी खातात त्यानंतर अर्जुन अप्पीच्या हातच्या पाणीपुरीची स्तुती करतो. सगळेजण आपापल्या कामाला निघून गेल्यावर रूपाली अमोलला आर्या व अर्जुनच्या जोडीवरुन डिवचते. मात्र अमोल हार न मानता म्हणतो की, सिंबा स्टाईलने मी हे सगळं मिळवूनच राहणार. तर इकडे अर्जुनचे बाबा अप्पीची माफी मागतात आणि सांगतात की, मी तुझी परीक्षा पाहण्यासाठी आर्याला बोलावलं होतं. मला माहिती आहे की तुझं अजूनही अर्जुनवर भरपूर प्रेम आहे. त्यावर अप्पीसुद्धा सांगते की, माझं पहिलं प्रेम अर्जुन व शेवटचं प्रेम अर्जुन आहे.
हे तुम्हाला आणि अर्जुनलासुद्धा चांगलंच माहिती आहे. यावर अर्जुनचे वडील कदम सांगतात की, आज पासून मी सुद्धा तुम्हा दोघांना एकत्र आणण्याच्या या तुमच्या प्लॅनमध्ये सहभागी आहे. अशा रीतीने अमोल, अप्पी, अर्जुनचे वडील, दीपेश हे एक टीम मिळून अर्जुन व अप्पीला एकत्र आणण्यासाठी काय काय करणार, हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.