Sairaj kendre : २०२३ मध्ये गणपतीच्या दिवसांत ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यामुळे बालकलाकार साईराज केंद्रे घराघरांत पोहोचला. साईराजला या गाण्यातील त्याच्या हावभावाने साऱ्यांच्या मनावर राज्य केलं. या गाण्यामुळे प्रसिद्धीस आलेला हा बालकलाकार ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेमुळे पुन्हा एकदा लोकप्रियतेस आला. मालिकेत साईराजच्या एन्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत साईराजने अमोल ऊर्फ सिम्बा हे पात्र साकारलं आहे. मालिकेत प्रेक्षकांना सात वर्षांचा लीप पाहायला मिळाला आणि त्यानंतर साईराजची एन्ट्री झाली होती. त्याचे निरागस हावभाव, दमदार अभिनय यामुळे मालिकेच्या टीआरपीवर देखील सकारात्मक परिणाम झाला.
साईराज म्हणजेच सिंम्बा सोशल मीडियावर बर्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच त्याचे आई-वडील इंस्टाग्राम अकाउंटवरुन काही ना काही शेअर करत असतात. अशातच चिमुकल्या सिंबाने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. साईराज आता दादा झाला असल्याचं समोर आलं आहे. सिंबाने त्याच्या लहान बहिणीचं स्वागत केलं आहे. सिंबाचा चिमुकल्या बाळाबरोबरचा फोटो त्याच्या वडिलांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी “मी दादा झालो. दीदी” असं कॅप्शनही दिलं आहे.
आणखी वाचा – अनुराग कश्यपच्या लेकीचं थाटामाटात लग्न, भर मंडपात नवऱ्यासह रोमँटिक झाली आलिया, फोटो व व्हिडीओ व्हायरल

केंद्रेंच्या घरी चिमुकलीचे आगमन झालं आहे. चिमुरड्या बहिणीला पाहून सिंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. बहिणीला मांडीवर घेऊन त्याने फोटो काढला आहे. यामध्ये तो खूपचं खुश दिसत आहे. मालिकेच्या चित्रीकरणानिमित्त या लहानग्या सिम्बाला आपल्या आईपासून दूर राहावं लागतं. नुकताच दिवाळी निमित्त साईराज त्याच्या घरी म्हणजेच मूळ गावी परतला होता. मात्र, आता चित्रीकरणासाठी पुन्हा त्याला सेटवर यावे लागले. त्यानंतर आता बहीण झाली ही गोड बातमी समजताच साईराज पुन्हा त्याच्या मूळ गावी परतला आहे.
आणखी वाचा – सिद्धार्थ शुक्लाला अजूनही विसरु शकली नाही शहनाज गिल, वाढदिवसाला भावुक पोस्ट, म्हणाली, “तो असता तर…”
साईराजचं त्याच्या आई-वडिलांबरोबर खास बॉण्ड आहे. नेहमीच ते सोशल मीडियावरुन कुटुंबाबरोबरचे फोटो पोस्ट करताना दिसतात. इतकंच नाही तर साईराज व त्याच्या आईच्या अनेक रील व्हिडीओला प्रेक्षकांची पसंती मिळालेली पाहायला मिळाली आहे.