‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत अर्जुन व अप्पी पुन्हा एकदा समोरासमोर आलेले पाहायला मिळत आहेत. मालिकेत समोर आलेल्या भागामध्ये गायतोंडे अपर्णाला सांगतात की, तुम्ही दोघं शिकलेले आहात. सुशिक्षित आहात तुम्ही दोघांनी एकत्र यायला पाहिजे आणि तुमचा आतापर्यंतचा प्रवास मी पाहिला आहे त्यामुळे मला असं वाटतं की, तुम्ही दोघांनी एकत्र एकमेकांशी बोलायला हवं, मात्र ती म्हणते की, अर्जुनचा रोष माझ्यावरच आहे. त्याने सगळ्या गोष्टींचं खापर माझ्यावरच फोडलं आहे. त्यामुळे मला नाही वाटत तो ऐकेल. (Appi Amachi Collector Serial Update)
त्यानंतर अप्पी व अर्जुन दोघेही स्पर्धा परीक्षांच्या एका क्लासमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जातात. एकाच कार्यक्रमाला एकत्र एकमेकांसमोर ते पुन्हा एकदा आलेले असतात. त्यावेळेला दोघं एकमेकांची ओळख न सांगताच आपापलं काम आणि कर्तव्य बजावत असतात. कार्यक्रम संपल्यानंतर अप्पी अर्जुनला म्हणते, तू आज खूप छान बोललास. तर अर्जुनही अप्पीचं कौतुक करताना दिसतो. त्यानंतर अप्पी अर्जुनला म्हणते की, गडावर आपण भेटलो होतो तेव्हा तुझा सगळा रोष हा माझ्याकडे होता. हा पण मी तू दिलेलं वचनच पळत आहे हे तू लक्षात ठेव.
यावर अर्जुन मात्र अप्पीच ऐकून घेत नाही तो म्हणतो की, गेल्या सात वर्षापूर्वी जर तू गेलीच नसतीस तर आज चित्र बदललेलं असतं. बोलून झाल्यावर दोघेही आपापल्या मार्गी निघून जातात. तर इकडे अर्जुनला गायतोंडेही भेटतात, गायतोंडे ही अर्जुनला सांगतात. तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलावं, तुम्ही मला परत त्रास द्या की मॅडम कुठे आहेत?, कशा आहेत हे तुम्ही मला विचारावं, असं मला वाटतं.
त्यावेळी अर्जुन गायतोंडेंना सांगतो की, आता तसं आमच्यात काहीच राहील नाही. अर्जुन व अप्पी अमोलसाठी एकत्र येणार का?, हे पाहणे मालिकेत रंजक ठरेल.