Anurag Kashyap Surname And Cast : बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप त्यांच्या वादग्रस्त मतासाठी ओळखला जातो. यामुळे तो बर्याचदा वादाच्या भोवऱ्यातही अडकला आहे. सध्या अनुराग कश्यप पुन्हा एकदा वादात सापडला आहे. खरं तर, त्याला अनंत महादेवनच्या आगामी चित्रपट फुलेवर सीबीएफएसीने केलेल्या काटछाटवर नाराज होते. यानंतर, त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन ब्राह्मण समुदायावर आक्षेपार्ह टिप्पण्या पोस्ट केल्या. तेव्हापासून अनुराग कश्यपवर खूप टीका झाली आहे. बर्याच ठिकाणी त्याच्याविरुद्ध पोलिस तक्रार देखील करण्यात आली आहे. या सर्वात अनुराग कश्यप नेमका कोणत्या जातीमधून आला आहे? आणि त्याने त्याचे आडनाव का काढले?, याबाबत आज सविस्तर जाणून घेणार आहोत.
अनुराग कश्यप हा कायस्थ कुटुंबातील आहे. त्याचा जन्म १० सप्टेंबर १९७२ रोजी गोरखपूर शहरात झाला. त्याच्या वडिलांचे नाव प्रकाश सिंग होते आणि ते अप पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मुख्य अभियंता म्हणून काम करत होते. चित्रपट निर्माता अनुराग यांनी सन २०१८ मध्ये जयपूर साहित्य महोत्सवात आपल्या नावापुढील सिंग हे आडनांव काढून टाकण्याविषयी भाष्य केलं, परंतु त्यांनी आपल्या जातीबद्दल काहीही स्पष्ट केले नाही.
अनुराग कश्यप याने जयपूर साहित्य महोत्सवात आपले आडनाव काढून टाकण्याचे कारण उघड केले होते. त्याने असे म्हटले होते की, आपत्कालीन परिस्थितीत त्याच्या वडिलांनी आपले आडनाव सिंग काढून टाकले होते कारण त्यावेळी नावाच्या मागे सिंग लागू केल्यामुळे बर्याच अडचणी आल्या आणि वडिलांनी भीतीमुळे सिंग हे आडनांव काढून टाकले आणि काश्यप आडनाव ठेवले. अनुराग पुढे म्हणाले की, केवळ त्याचे वडीलच त्याचे खरे कारण सांगू शकतात. १९८८ पर्यंत त्याचे खरे नाव रिंकू सिंग होते, असेही अनुरागनेही या वेळी उघड केले.
आणखी वाचा – Whatsapp वर आधी हाय-हॅलोचा मॅसेज, नंतर १५० रुपयांचं मिळतं काम, तुमच्याबाबतीतही हे घडलं असेल तर…
“ब्राह्मणांवर लघवी करतील” या हिंदी चित्रपटाशी संबंधित वादाविषयी अनुराग कश्यप याने भाष्य केले. या वादग्रस्त विधानानंतर अनुराग कश्यपवर जोरदार टीका होत आहे. .त्यानंतर त्याने सोशल मीडियावर माफीही मागितली. त्याने पोस्ट शेअर करत म्हटलं की,”माझ्या आयुष्यातील पहिल नाटक ज्योतिबा व सावित्री बाई फुले यांच्या जीवनावर आधारित होतं. या देशात जातीवाद नसताच तर फुलेंना लढण्याची गरजच लागली नसती. आता ब्राम्हणांना याची लाज वाटते किंवा भारतात असा काही ब्राम्हणांचा समाज आहे ज्यांना हे सगळं समजूनच घ्यायचं नाही. इथे खरं मुर्ख कोण आहे? तुम्हीच सांगा. पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं की, देशात आता जातीवाद संपूर्ण संपला आहे. मग ब्राम्हण ‘फुले’ चित्रपटावर आक्षेप का घेत आहेत?. तुम्ही मग कोण?, का इतकं त्रास करुन घेता”.
अनुराग कश्यप यांच्या ब्राह्मण समुदायावरील अश्लील भाष्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅडव्होकेट आशिष राय यांनी मुंबईत अनुरागविरूद्ध तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर १ एप्रिल एप्रिल रोजी अनूप शुक्ला यांनी इंदूरमधील चित्रपट निर्मात्यांविरुद्ध तक्रार केली. आता जयपूरमधील ब्राह्मण सोसायटीच्या लोकांनी कश्यपविरुद्ध पोलिसात एफआयआर दाखल केला आहे.