Ankita Walavalkar Prewedding : ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय रिऍलिटी शोने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. यंदाचा हे पर्व विशेष चर्चेत असलेलं पाहायला मिळालं. यंदाच्या या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची हवा पहायला मिळाली. विशेषतः कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने ‘बिग बॉस’च्या घरात तूफान राडे केले. ‘बिग बॉस’च्या घरात असताना आणि घराबाहेर पडल्यानंतरही ती बरेचदा चर्चेत असलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’ संपून आता बरेच दिवस झाले असले तरी अंकिता नेहमी सोशल मीडियावर सक्रिय राहून काही ना काही शेअर करत असते आणि ती प्रेक्षकांच्या संपर्कात राहते.
सध्या अंकिता वालावलकरची लगीन घाई सुरु आहे. अंकिताने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कुणाल भगतसह रिलेशनशिपमध्ये असल्याची जाहीर कबुली सोशल मीडियामध्येद्वारे दिली. अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने तिच्या बॉयफ्रेंडबरोबरच्या हाताचा फोटो शेअर केला होता. या पोस्टमुळे अंकिताचा बॉयफ्रेंड कोण असेल याबद्दल उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यानंतर ‘बिग बॉस’ संपल्यावर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत जाहीर कबुली दिली.

अंकिता सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच सध्या अंकिता तिच्या गावी कोकणात आहे. आणि कोकणात अंकिता तिच्या लग्नाआधीच्या फोटोशूटसाठी नवऱ्यासह पोहोचली आहे. प्रेवेडींगसाठी ती कोकणातील देवबाग समुद्रकिनारी पोहोचली आहे. “प्रिवेंडिंगला एवढ्या प्रिसकाळी कोण उठवत?”, असं कॅप्शन देत अंकिताने एक स्टोरी पोस्ट केली आहे. तर ही स्टोरी रिपोस्ट करत कुणालने मी असं उत्तर दिलं आहे.
आणखी वाचा – सैफ अली खानबरोबरच शाहरुख खानवरही हल्ला करण्याचा होता प्लॅन, मोठी माहिती समोर, पोलिसांकडून खुलासा
अंकिताने याचबरोबर आणखी एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये प्रिवेंडिंगसाठी अंकिता बोटीने देवबागच्या समुद्रकिनाऱ्यावरुन प्रवास करताना दिसतेय. अंकिताची ही स्टोरी पाहून तिच्या व कुणालच्या प्रिवेंडिंगचे फोटो पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अंकिता व कुणाल यांच्या लग्नपत्रिकेची झलक समोर आली. दोघेही केव्हा लग्नबंधनात अडकणार हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.