सध्या देशभरात अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा सुरू आहे. १२ जुलै रोजी त्यांचा विवाह मुंबई येथील जिओ कन्वेन्शन सेंटर येथे थाटामाटात पार पडला. या शाही विवाहसोहळ्यासाठी जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. बॉलीवूडमधील कलाकारांचीदेखील उपस्थिती दिसून आली. सगळ्यांचे अनेक व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार दिसून आले. त्याचबरोबर बॉलीवूडमधील अमिताभ बच्चन, जय बच्चन, शाहरुख खान, रजनीकांत, दीपिका पदूकोण, रानवीर सिंह असे अनेक कलकार कलाकार उपस्थित राहिले होते. आशातच आता माधुरी दीक्षितचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (madhuri dixit video viral)
अनंत व राधिकाच्या लग्नात माधुरी व तिचा पती डॉ. श्रीराम नेनेदेखील उपस्थित होते. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘खलनायक’ या चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यावर थिरकताना दिसली. अभिनेत्रीच्या मागे तिचे पती श्रीरामही उभे होते. ते माधुरीचा डान्स बघताना दिसले. ते माधुरीकडे खूप कौतुकाने बघत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. संबंधित गाण्यावर उपस्थित असणारे सगळेच जण नाचताना दिसत आहेत.
माधुरीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. तसेच अनेकांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एकाने प्रतिक्रिया दिली की, “माधुरीचे पती किती कौतुकाने बघत आहेत”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “ती खूप सुंदर आहे. या गाण्यावर खूप छान डान्स करत आहे”. अजून एकाने लिहिले आहे, “माधुरी कमालीची सुंदर आहे”. माधुरीच्या व्हिडिओवर खूप कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. माधुरीने या वेळी पेस्टल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. श्रीरामदेखील पारंपरिक कुर्ता पायजमामध्ये दिसून आले.
दरम्यान माधुरी व अनंत यांच्या लग्नाला किम कर्दाशियन व क्लोई दिसून आली. त्याचप्रमाणे राधिका व अनंत यांचे लग्नातील पेहरावदेखील चांगलेच चर्चेत राहिले आहेत. राधिकाचा लहंगा अबू जानी व संदीप खोसला यांनी डिझाईन केला होता, अनंतने लाल व गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली होती.