बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी कलाकारांनी असा साजरा केला हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, पारंपरिक अंदाजातले खास फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 9, 2024 | 7:11 pm
in Entertainment
Reading Time: 15 mins read
google-news
Amruta Khanvilkar, Prathanna Behere, Prasad Oak, Mugdha Prathamesh, Pooja Sawant shared special photos on the occasion of Gudi Padwa and wished toall

मराठी कलाकारांनी ‘असा’ साजरा केला हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, पारंपरिक अंदाजातले खास फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा!

आज ९ एप्रिल, गुढीपाडवा. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. आज गुढीपाडवानिमित्त सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र गुढीपाडवा अगदी जल्लोषात व उत्साहात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त आज शोभायात्रांचे आयोजन केले गेले आहे. सामान्य व्यक्तीसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीही गुढीपाडवा साजरा करत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आजच्या या खास गुढीपाडव्याचे पारंपरिक अंदाजातले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि सर्वांना आजच्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री अमृता खानविलकरनं मराठमोळ्या पारंपरिक अंदाजात गुढीपाडवा साजरा केला आहे. तिनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी अमृताने गुलाबी रंगाची साडी व त्यावर गुलाबी रंगाचा ब्लाऊज असा लूक केला.

View this post on Instagram

A post shared by Shashank Sane (@saneshashank)

प्रार्थना बेहेरेनेदेखील गुढीचा व शंखनाद करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच सण हर्षाचा, नव्या संकल्पांचा, इच्छा आकांक्षा, स्पप्नपूर्तींना बळ देणारा” असं म्हणत तिने सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prarthana ???? (@prarthana.behere)

अभिनेता प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर यांनी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा खास पद्धतीने साजरा केला. त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kshitija Ghosalkar Parab (@miles_in_style)

अभिनेता स्वप्निल जोशीनेही सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  सुरुची-पीयूष, मुग्धा-प्रथमेश, पूजा-सिद्धेश यांनीही गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणत सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ फेम प्रथमेश व मुग्धानेही पारंपरिक लूकमधला फोटो शेअर केले आहेत. तसेच या फोटोखाली “तुम्हा सर्वांना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या खूप शुभेच्छा” असं म्हणत करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक आणि अक्षया यांची लोकप्रिय जोडीनेही गुढीबरोबरचा फोटो शेअर करत सर्वांना आजच्या या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावारे यांनीही खास व्हिडीओ शेअर करत सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

अभिनेता सुबोध भावे आणि मंजिरी भावे यांनी त्यांच्या कुटुंबियांबरोबर खास व्हिडीओ शेअर करत गुढीपाडव्याचया शुभेच्छा दिल्या आहेत. ‘हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा … आमची (भावे कुटुंबाची) गुढी आमच्या पुण्याच्या बुधवार पेठेच्या घरी उभारली जाते. मुलांच्या लहानपणापासून त्यांना कळावं म्हणून मुंबईत आमची ही रेडिमेड गुढी …’ असं कॅप्शनदेखील देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Manjiri Subodh Bhave (@manjirisbhave)

Tags: Gudhipadwa 2024 Newsmarathi entertainment newsMarathi news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
today 10 april 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

आजचे राशी भविष्य : मेष ते मीन राशीपर्यंत, सर्व राशींसाठी बुधवारचा दिवस कसा असेल? जाणून घ्या….

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.