मालिका, नाटक, चित्रपट अशा तीनही माध्यमांत सक्रिय असणारे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते डॉ. अमोल कोल्हे विशेषतः ऐतिहासिक पात्रांसाठी ओळखले जातात. अभिनयाबरोबरच अमोल कोल्हे यांनी राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला असून ते खासदारदेखील आहे. अमोल यांनी अनेक नाटक, मालिका व चित्रपट केल्या, पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली ती छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेतून. (Amol Kolhe)
एकीकडे राजकीय क्षेत्रात काम करताना अमोल कोल्हे दुसरीकडे मनोरंजनविश्वातही सक्रिय असून त्यांनी अनेक ऐतिहासिक कलाकृतींमध्ये अभिनय केला आहे. शिवाय ते निर्मितीक्षेत्रातही आपलं नशीब अजमावत आहेत. अमोल कोल्हे नुकतेच अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात आले, तेव्हा त्यांनी महाराजांची भूमिका साकारताना त्यांना आलेला अनुभव सांगितला. (amol kolhe in khupte tithe gupte)
संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात आजवर अनेक मान्यवर आले. कार्यक्रमात अवधूत जेव्हा त्यांच्या मनातील खुपणारे प्रश्न मान्यवरांना विचारतात, तेव्हा ते या सगळ्या प्रश्नांना उत्तर देतात. याच कार्यक्रमाच्या नवीन भागात अभिनेते अमोल कोल्हे हे येणार असून त्याचे प्रोमोस समोर आले. प्रोमोमध्ये अमोल कोल्हे यांनी एक किस्सा सांगितला, ज्यात एका दिग्गजांनी त्यांना महाराजांची भूमिका न करण्याचा सल्ला दिला होता.
काय म्हणाले अमोल कोल्हे या भूमिकेबद्दल ? (amol kolhe in khupte tithe gupte)
अमोल कोल्हे यांनी हा किस्सा सांगताना म्हणाले, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या खाली मला एक दिग्गज रंगकर्मी भेटले, तेव्हा त्यांनी मला आवर्जून सांगितलं की तु महाराजांची भूमिका करू नकोस, ती कधीच फळत नाही. जेव्हा पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली, तेव्हा मी जेमतेम २८ वर्षांचा होतो. जर २८ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून दख्खनच्या पठारावर स्वत:ची द्वाही फिरवली. आपल्याला २८ व्या वर्षी संधी मिळतेय, तर ही संधी घ्यायला काय हरकत आहे, असा विचार करून मी ही भूमिका साकारल्याचे अमोल यांनी सांगितले. (amol kolhe in khupte tithe gupte)

अभिनेते अमोल कोल्हे यांनी राजा शिवछत्रपती, स्वराज्यजननी जिजामाता, शिवप्रताप गरुडझेप यांसारख्या मालिका व चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. पुढे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत ते छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसले होते. अमोल यांचं ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला होतं, ज्यांस प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. (Amol Kolhe)