हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २: द रुल’च्या प्रीमियर शोदरम्यान (०४ डिसेंबर) चेंगराचेंगरी झाली. सुपरस्टार अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी मोठा जनसमुदाय जमला असताना चेंगराचेंगरी झाली, त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि गोंधळ उडाला. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिचा १३ वर्षांचा मुलगा जखमी झाला. जिथे त्याच्या आईचा मृत्यू झाला. त्याच वेळी, तो अजूनही रुग्णालयात आहे आणि व्हेंटिलेटरवर आहे. (Pushpa 2 The Rule premiere injured boy condition)
या जखमी मुलाचे नाव तेजा आहे. आणि त्याला वेळोवेळी तापही येत असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे. तसंच काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉस्पिटलने १४ डिसेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुलगा सध्या PICU मध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे. त्याला नळीद्वारे आहार दिला जात आहे. मात्र, त्याला वेळोवेळी ताप येत राहतो.
आणखी वाचा – मृणाल दुसानिसला मालिकेत पाहताच क्षणी तिच्या लेकीची ‘अशी’ होती प्रतिक्रिया, म्हणाली, “माझा आवाज ऐकताच ती…”
या प्रकरणाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे. रविवारी, 8 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये संध्या थिएटरचे मालक, थिएटरचे व्यवस्थापक तसेच लोअर बाल्कनी-अपर बाल्कनीचे व्यवस्थापक यांचा समावेश आहे.
आणखी वाचा – Video : भजन, आरती अन्…; दत्तगुरुंच्या सेवेत रमली जुई गडकरी, घरातील दत्त जयंती उत्सवाचा खास व्हिडीओ केला शेअर
दरम्यान, या प्रकरणी अल्लू अर्जुन १३ डिसेंबरला तुरुंगात गेला होता. सुमारे १२ तास थांबल्यानंतर न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आणि त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. तसंच अभिनेत्याने पीडितेच्या कुटुंबाची माफी मागितली असून कुटुंबाला २५ लाख रुपये नुकसानभरपाईही दिली आहे.