बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना नेहमीच चर्चेत असते. १९९५ साली ‘बरसात’ या चित्रपटातून अभिनेत्रीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ट्विंकलने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं पण तिचा हा प्रवास फार काळ टिकला नाही. २००१मध्ये तिने अभिनय जगताचा निरोप घेतला. त्यावर्षी रिलीज झालेल्या ‘लव के लिए कुछ भी करेगा’ या चित्रपटात तो अखेरचा दिसला होता. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ट्विंकलने १७ जानेवारी २००१ रोजी अक्षय कुमारबरोबर लग्न केले. दोघांना मुलगा आरव व मुलगी नितारा अशी दोन मुले आहेत. (Twinkle Khanna Statement)
ट्विंकल खन्नाने अलीकडेच अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या स्तंभात प्री-वेडिंग फंक्शनबद्दल भाष्य केलं. यावेळी तिने सांगितले की, तिच्या मुलांनी पळून जाऊन लग्न करावे अशी तिची इच्छा आहे. यामागचे कारणही तिने उघड केले आहे. ट्विंकल म्हणाली, “माझी बहिण माझ्या विचारांमध्ये अडथळा आणते. तुम्ही मोठ्या आडनावांबद्दल बोलत आहात, पण त्या सगळ्या मोठेपणाचं काय? अंबानींच्या कार्यक्रमानंतर, या अपेक्षा खूप उंचावल्या आहेत. यावर मी उत्तर देईन की, ‘ठीक आहे, मला नीता भाभींसारखे नाचता येत नाही. शेवटच्या वेळी जेव्हा मी करोना महामारीच्या काळात ‘तम्मा तम्मा’वर नाचण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवालाही मी नाचू नये असंच वाटले असावे कारण मी नाचताना पडले आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला”.
ट्विंकलने सांगितले की तिचा नवरा अक्षय कुमार रात्री १० वाजल्यानंतर जागं राहू शकत नाही आणि जेव्हाही त्याला २० पेक्षा जास्त लोकांसाठी डिनर पार्टी आयोजित करावी लागते तेव्हा दोघेही नाराज होतात.ट्विंकलने असेही सांगितले की, जर तिच्या मुलांना आनंदी राहायचं असेल तर ते पळून जाऊ शकतात. ट्विंकल म्हणाली, “माझे पती रात्री १० वाजल्यानंतर क्वचितच जागे राहू शकतात आणि आम्हा दोघांनाही २०पेक्षा जास्त लोकांसाठी डिनर पार्टी आयोजित करण्याचा खूप ताण येतो. असं वाटत पळून जावं”.
राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांची मुलगी ट्विंकलला तिच्या सुरुवातीच्या काळात अभिनयाची खूप आवड होती. त्यामुळे तिने या क्षेत्रात सुरुवातील पदार्पण केलं. मात्र, अक्षय कुमारबरोबर लग्न केल्यानंतर तिने करिअर सोडून लेखनाच्या दुनियेत प्रवेश केला. तिची आतापर्यंत ‘मिसेस फनीबोन्स’, ‘द लीजेंड ऑफ रायटिंग वर्ल्ड’ व ‘पायजामा आर फॉरगिव्हिंग’ ही तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.