सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘सुभेदार’ पाहिल्यानंतर अजय पुरकरांची लेक थिएटरमध्येच त्यांना मिठी मारुन रडली, भावुक व्हिडीओ व्हायरल

सौरभ जाधवby सौरभ जाधव
ऑगस्ट 26, 2023 | 1:05 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ajay Purkar Subhedar Movie

Ajay Purkar Subhedar Movie

समस्त हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अजरामर इतिहासावर अनेक चित्रपट येत असतात. काही चित्रपट हे प्रेक्षकांच्या काळजात कायमचं स्थान मिळवतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास रुपेरी पडद्यावर ८ चित्रपटांच्या रूपात मांडण्याचा ध्यास घेतला आहे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी. ८ चित्रपटांपैकी ५ व चित्रपट “सुभेदार” हा नुकताच प्रदर्शित करण्यात आला. तत्पूर्वी चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर आणि गाण्यांनी सर्वत्र चांगलाच धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. (Ajay Purkar Subhedar Movie)

सुभेदार चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांचे परम मित्र नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा इतिहास प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला. ५०० मावळ्यांसह कोंढाणासर करणं आणि त्यामागे असलेला त्याग या चित्रपट दाखवण्यात आला आहे. सोबतच महाराज आणि सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्यातील मैत्रीचं एक वेगळं नातं या चित्रपटात पाहायला मिळतं. नुकतंच चित्रपटात ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला. या प्रीमियर सोहळ्याला कलाकारांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील हजेरी लावली होती. चित्रपटातील अंगावर शहारे आणणाऱ्या प्रसंगांसोबतच चित्रपटा व्यतिरिक आणखी एक प्रसंग प्रेक्षकांच्या मनाला भावुक करून गेला तो म्हणजे चित्रपट संपल्यानंतर अजय पुरकर यांच्या मुलीचे डोळे पाणावलेले पाहायला मिळाले.(Ajay Purkar Daughter Emotional)

एखाद्या कलाकाराला त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी मिळणाऱ्या कोणत्याही पुरस्कारापेक्षा जवळच्या माणसांनी केलेलं कौतुक हे जास्त मोठं असत हे अजय पुरकर आणि त्यांच्या मुलीच्या या भावुक व्हिडिओवरून स्पष्ट होतं. सुभेदार या चित्रपटात अजय पुरकर यांनी नरवीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या पूर्वी ४ ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन केलं आहे. या मध्ये फर्जंद, पावनखिंड, फतेहशिकस्त, शेर शिवराज या चित्रपटांचा समावेश आहे.(subhedar review)

सुभेदार चित्रपटाची तारीख या आधी 2 वेळा बदलन्यात आली होती. परंतु चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांच भरभरून प्रेम चित्रपटाला मिळत आहे. चित्रपटाच्या गाण्यांच सध्या सर्वत्र कौतुक केल जातय.

Tags: ajay purkarajay purkar daughterSubhedarsubhedar movie
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Kareena Kapoor Khan OTT Debut

करीना कपूरचं 'जाने जान' चित्रपटामधून ओटीटीवर पदार्पण, टीझरची जोरदार चर्चा, कुठे आणि कधी पाहता येणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.