सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे अंबानी कुटुंबीयांची. मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्या प्री-वेडिंग फंक्शनची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. गुजरातमधील जामनगर येथे अनंत व राधिका यांच्या प्री-वेडिंगचा शाही थाटमाट पाहायला मिळाला. सलग तीन दिवस असणाऱ्या या कार्यक्रमात सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार मंडळींनी तसेच राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. इतकंच नव्हे तर परदेशी पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. (Aishwarya Rai Daughter Aaradhya Bachchan)
जामनगरमध्ये अलीकडेच बॉलिवूड कलाकारांचा मेळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी, सलमान खान, शाहरुख त्याच्या कुटुंबासह, रणबीर व आलिया आणि त्याची लेक राहा, रणवीर सिंग व दीपिका पदुकोण, विकी कौशल व कतरिना कैफ यांच्यासह सर्व बॉलिवूड सेलिब्रिटींनी भाग घेतला. तर अंबानी कुटुंबाने आयोजित केलेल्या या प्री-वेडिंगमधील रविवारी रात्री बच्चन कुटुंबाचे अनेक फोटो व व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यात सर्वांच्या नजरा ऐश्वर्या व अभिषेकची लेक आराध्यावर वळल्या आहेत.
आराध्याचा नवा लूक पाहणं रसिकांच्या पसंतीस पडलं. पांढऱ्या क्रीम लेहेंग्यात आई ऐश्वर्यासह आराध्याने बेबी पिंक रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. यावेळी आराध्या लाइमलाइटमध्ये उठून दिसली. आराध्याच्या लूकमधला सर्वात मोठा बदल म्हणजे तिची हेअरस्टाईल. आराध्याच्या या नव्या लूकने सोशल मीडियावर चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. प्रेक्षक आता आराध्याच्या या नव्या लूकबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. तर ट्विटरवर कमेंट करत काहींनी असं म्हटलं आहे की, “आराध्या ९०च्या दशकात तिची आई जशी दिसायची तशीच दिसते”. तर काहींनी, “ती हुबेहुब तिच्या आईसारखी दिसत आहे”.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी उपस्थित पाहुणे मंडळी पारंपरिक अंदाजात दिसले. यावेळी बच्चन कुटुंब या कार्यक्रमात सहकुटुंब सामील झालेल पाहायला मिळालं. रविवारी संध्याकाळी सर्वांनी महाआरतीमध्ये सहभाग घेतला.