Aishwarya Narkar Answers To His Fan : ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याचं यंदाचं २५ वं वर्ष अगदी दणक्यात पार पडलं. यंदाच्या ‘झी मराठी’ सोहळ्यात अनेक कलाकार मंडळींचा सन्मान करण्यात आला. यावर्षी सर्वच मालिकांमधील अनेक कलाकार मंडळींना झी मराठी पुरस्कार मिळाला. अनेक कलाकारांनी त्यांचे पुरस्काराबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यावर्षी सर्वोत्कृष्ट खलनायिका होण्याचा मान ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील भुवनेश्वरीला मिळाला. मात्र, या कॅटेगरीत ऐश्वर्या नारकर यांना देखील नामांकन मिळालं होतं. यावरुन अनेकांनी आपलं मत मांडायला सुरुवात केली आहे. अनेकांना हे सिलेक्शन खटकलेलं दिसत आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर आधी रुपाली आणि सध्या शतग्रीव हे खलनायिकेचं पात्र साकारत आहेत. या मालिकेत ऐश्वर्या यांनी खलनायिकेचं पात्र साकारलं. त्यांच्या या खलनायिकेच्या भूमिकेचं विशेष कौतुक होत आहे. अशातच यंदाचा हा पुरस्कार ऐश्वर्या नारकरांना मिळणं जास्त अपेक्षित होतं असं मत त्यांच्या अनेक चाहत्यांनी व्यक्त केलं. हे मत व्यक्त करणाऱ्या चाहत्यांना अभिनेत्रीने दिलेलं उत्तर सध्या लक्ष वेधून घेत आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’च्या घरात अभिजीत सावंतला झालेली दुखापत, आता फ्रॅक्चर काढलं अन्…; म्हणाला, “ही बंदूक…”

ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. बरेचदा ते चाहत्यांसह ‘आस्क मी एनिथिंग’ असा सेशन घेतात. यावेळी देखील ऐश्वर्या यांनी ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन घेतलं होतं. यावेळी चाहत्यांकडून त्यांना ‘झी मराठी’ पुरस्कारासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
आणखी वाचा – आयोध्येतील माकडांसाठी अक्षय कुमारचा मदतीचा हात, आई-वडील व सासऱ्यांच्या नावाने दान केले कोटी रुपये कारण…
“खलनायिकेचा पुरस्कार तुम्हाला मिळाला पाहिजे होता. म्हणजेच शतग्रीवला. तुम्ही खूप छान काम करता”, असं ऐश्वर्या यांच्या चाहत्याने म्हटलं. यावर पहिल्या पोस्टवर ‘hmmm’ लिहित पुढे हसण्याचा इमोजी अभिनेत्रीने दिला. तर, दुसऱ्या पोस्टवर “तुम्हाला हा पुरस्कार मला मिळावा हे वाटलं हेच माझ्यासाठी अवॉर्ड आहे”, असं म्हणत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या. ऐश्वर्या नारकर यांनी दिलेल्या उत्तराने साऱ्यांची मनं जिंकली आहेत.