Aishwarya Narkar And Avinash Narkar : सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अनेकजण दिवाळीनिमित्त उत्साहाने तयारी करताना दिसत आहेत. अशातच अनेक कलाकार मंडळीही दिवाळीच्या तयारीला लागले आहेत. सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत त्यांनी दिवाळी स्पेशल तयारीचे अनेक व्हिडीओ, फोटो शेअरही केले आहेत. अशातच नेहमीच चर्चेत असणार मराठमोळं कपल म्हणजेच नारकर कपलही दिवाळी सणानिमित्त तयारीला लागलं आहे. ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांनी दिवाळीची जोरदार तयारी सुरु असल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे.
मालिकाविश्वातील हे नारकर कपल नेहमीच चर्चेत असलेलं पाहायला मिळालं आहे. नाटक, मालिका, चित्रपट यांसारख्या तीनही माध्यमातून ऐश्वर्या व अविनाश यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. कलाकार म्हणून गेला अनेक काळ ही जोडी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. त्यांच्या कामाबरोबरच ही जोडी सोशल मीडियावर देखील विशेष चर्चेत असते. त्यांचे ट्रेंडिंग गाण्यावरचे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात. आजही त्यांचा तो उत्साह काळानुसार पुढे जाण्याची वृत्ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते.
आणखी वाचा – अर्जुन कपूर व मलायका अरोरा कायमचे विभक्त?, ब्रेकअपच्या चर्चांवर अभिनेत्याचा शिक्कामोर्तब, म्हणाला…
अशातच अविनाश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन दिवाळी स्पेशल तयारीचा सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नारकरांच्या घरी फराळाची जय्यत तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अविनाश हे करंजी बनवताना दिसत आहेत. अविनाश यांनी करंजी बनवतानाचा त्यांचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी साऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय साऱ्यांना फराळाला या असं आमंत्रणही दिलं आहे.
आणखी वाचा – वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतली नवीकोरी आलिशान कार, खास नावही ठेवलं अन्…; फोटो व्हायरल
“चला चला या या या. सगळयांनी फराळाला या. मी, ऐश्वर्या आणि आमच्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला या मंगलमय , तेजोमय दिवाळी आणि नवीन वर्षांच्या खूप खूप खूप मनापासून शुभेच्छा”, असं कॅप्शन देत त्यांनी करंजी बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अविनाश यांच्या पत्नी ऐश्वर्या यांनी “कमाल करंज्या”, अशी कमेंट करत त्यांच्या कौतुक केलं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत पसंती दर्शविलेली पाहायला मिळत आहे.