मराठमोळी अभिनेत्री व नृत्यांगना मानसी नाईक हिच्या पूर्वाश्रमीच्या पतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीने साखरपुडा केला असल्याचं समोर आलं आहे. प्रदीप खरेराच्या साखरपुड्याची अपडेट समोर आली आहे. त्यांच्या साखरपुड्यातील खास क्षणांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्याने एका सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरशी साखरपुडा केला असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. प्रदीपच्या होणाऱ्या पत्नीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. (Pardeep kharera Engagement)
प्रदीपच्या साखरपुड्याच्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. प्रदीपच्या होणाऱ्या पत्नीचे नाव विशाखा जाटनी असे आहे. विशाखाने ही पोस्ट प्रदीपला टॅग केली आहे. प्रदीप हा पेशाने बॉक्सर आहे. याशिवाय तो उत्तम सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. सोशल मीडियावर प्रदीप व विशाखा दोघेही बऱ्यापैकी सक्रिय असतात.
“फायनली इंगेज्ड व वी डिड इट” असं कॅप्शन देत विशाखाने त्यांच्या साखरपुड्याला व्हिडीओ प्रदीपला टॅग करत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रदीप व विशाखा दोघेही खूप सुंदर दिसत आहे. मॅचिंग कपडे परिधान करत दोघांनी रोमँटिक फोटोशूट केलेलं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये दोघांच्या अंगठ्यांची झलकही पाहायला मिळत आहे. प्रदीप व विशाखाच्या या साखरपुडा उरकल्याच्या आनंदाच्या बातमीवर अनेकांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’च्या गोलीने १६ वर्षांनी सोडली मालिका, म्हणाला, “मी आता खूप…”
विशाखा व प्रदीपने सेल्फी या गाण्यादरम्यान एकत्र काम केले होते. प्रदीपची होणारी पत्नी ही सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. तिचे इन्स्टाग्रामवर जवळपास सात मिलियन फॉलोअर्स आहेत. मानसी नाईक व प्रदीप खरेरा यांनी जानेवारी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या अवघ्या दीड वर्षातच मानसी व प्रदीप वेगळे झाले. २०२३मध्ये मानसीने एक धक्कादायक गोष्ट सगळ्यांसमोर आणली. तिने पती प्रदीप खरेरासह घटस्फोट घेणार असल्याचं जगजाहिर केलं. आता अखेरीस तिचा घटस्फोट झाला आहे.