सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत असताना लोकप्रिय अभिनेत्री लग्नबंधनात अडकल्या. यांत मराठी सिनेसृष्टीतील पेक्षकांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत हिच्या लग्नाची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. २८ फेब्रुवारी रोजी पूजाने तिचा बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली. पूजाच्या शाही लग्नसोहळ्याने साऱ्यांना वेड केलं. बॉलिवूड स्टाईलने पूजा सावंतचा विवाहसोहळा संपन्न झाला. जवळचे नातेवाईक, कुटुंबीय व कलाकार मंडळींच्या उपस्थितीत पूजा व सिद्धेश लग्नबंधनात अडकले. (Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding)
लग्नाला एक महिना पूर्ण होताच पूजाने शेअर केलेल्या एका खास व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “मी काल रात्री पाहिलेल्या सर्वात सुंदर स्वप्नातून जाग आल्यासारखं वाटत आहे. एक महिना कधी झाला यावर विश्वास बसत नाही”, असं हटके कॅप्शन देत पूजाने तिच्या शाही विवाहसोहळ्यातील सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. पूजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लग्नातील खास क्षण टिपले असून ते पाहणं फार रंजक ठरतंय.
पूजाने लग्नातील शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पूजा व सिद्धेशचा खास लूक पाहायला मिळाला. तसेच वरमाला घालतानाचा खास क्षणही पाहायला मिळाले. यावेळी पूजाची बहीण व आई भावुक झालेली ही पाहायला मिळाली. लेक सासरला जाताना पाहून पूजाच्या आईला भरून आलं, त्यावेळी सुखदा खांडकेकर त्यांना धीर देताना दिसली. तर लेकीच्या लग्नात तिचे बाबा थिरकताना दिसले. पूजाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये लग्नातील शाही थाटमाट डोळे दिपवणारा होता.
पूजाच्या बहिणीने म्हणजेच रुचिराने ही हा व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर केला असून “अरे देवा, मी आज पुन्हा रडले, खूप सुंदर व्हिडीओ आहे. मी तुला मिस करत आहे”, असं कॅप्शन दिलं आहे. पूजाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. तर अनेकांनी या व्हिडीओला पसंती दर्शविली आहे. सध्या पूजा लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसत आहे. पूजाचा नवरा सिद्देश हा ऑस्ट्रेलिया येथे कामाला आहे. त्यामुळे सध्या ती तिच्या नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलिया येथे आहे.