Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide: कलाक्षेत्रातील महत्वाचं नाव म्हणजे कला दिग्दर्शक नितीन देसाई. आज सकाळी नितीन देसाई यांच्या आत्महत्येची खळबळजनक बातमी समोर येताच मराठीसह हिंदी सिनेसृष्टीदेखील हळहळली.नितीन देसाई दोन दिवसांपासून एन. डी. स्टुडिओमध्येच होते, त्यांची कामही सुरूच होती. दरम्यान आज सकाळी त्यांनी कोणाच्याही फोनला उत्तर दिलं नाही. त्यांनतर कर्मचाऱ्यांनी एन. डी. स्टुडिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं. तेव्हा नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं.नितीन देसाई यांच्या आत्महत्येमागचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही.(Nitin Desai Suicide)
नितीन देसाईंच्या अशा अचानक जाण्याने सिनेसृष्टी हादरली आहे . अनेक कलाकार त्यांच्याबरोबरच्या कामाचे अनुभव सांगून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.या कलाकारांमध्ये अभिनेते सुबोध भावे यांचा देखील समावेश आहे. नितीन देसाई यांच्या आठवणीत ‘एबीपी माझाशी’ संवाद साधताना सुबोध म्हणाले, ‘नितीन सारख्या लढवय्या कलाकाराविषयी अशी बातमी ऐकून मोठा धक्का बसला.”आपल्या मित्राच्याबाबतीत असं काही घडलं आहे ही गोष्ट मान्य करायला अजूनही मन तयार नाही”
पाहा नितीन देसाई यांच्या निधनानंतर सुबोध भावेंनी दिलेली प्रतिक्रिया (Nitin Desai Suicide)

पुढे सुबोध म्हणाले,”नितीनची कामाची पद्धत, कामाविषयी त्याच प्रेम याला काही तोड नव्हता.आजवर अनेक संकटातून तो बाहेर आला होता. एक-दोन वर्षांपूर्वी त्याच्या स्टुडिओचा काही भाग जळला होता. त्यातूनही तो बाहेर आला. कामानिमित्त आमचं सातत्याने बोलणं व्हायचा, मागच्या महिन्यातच आम्ही भेटलो होतो.त्याच्या सारख्या माणसाने हे पाऊल उचलणं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याला काही त्रास असेल तर छोट्या छोट्या गोष्टी तो बोलून दाखवायचा नाही.लढवय्या होता तो, नितीन असं काही पाऊल उचलेल हे स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं.आम्ही भेटलो तेव्हा त्याने स्वतः आस्थेने आम्हाला स्टुडिओ फिरून दाखवला होता. अजूनही तो स्वस्थ बसला नव्हता. एका वेबसीरिजचं त्याच काम सुरु होत.त्याच्याकडे बघून वयोपरत्वे जे काही बदल जाणवतील तेच जाणवायचे. त्याने शून्यातून स्वतःच साम्राज्य उभं केलं त्याच्या बदल नेहमीच मनात प्रेम, आदर आणि अभिमान आयुष्यभर राहील”. (Subodh Bhave On Nitin Desai Suicide)
हे देखील वाचा : Nitin Desai Suicide : “चार ते पाच वेळा फोनवर बोलणं आणि…”, नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर अमोल कोल्हेंना मोठा धक्का, म्हणाले, “आम्ही दोघांनी…”
कला दिग्दर्शक नव्हे तर अभिनय क्षेत्र तसेच बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातही नितीन चंद्रकांत देसाई यांचं नांव अव्वल स्थानावर होते. मनसे नेते व दिग्दर्शक अभिजीत पानसे, आदेश बांदेकर, जितेंद्र जोशी, अमोल कोल्हे यांसारख्या कलाकारांचाही नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर उर भरून आला. त्यांच्या विषयीच्या आठवणी सांगत नितीन देसाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.