‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बक्कळ पैसे कमावण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. या चित्रपटातून अभिनेत्री अदा शर्माचा अभिनय पाहणं रंजक ठरलं. अदाने याआधी हिंदी, तमीळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटात काम केलं आहे. मात्र अदाला खारट अर्थाने लोकप्रियता मिळाली ती द केरला स्टोरी या चित्रपटामुळेच. अदाने बॉलिवूड मध्ये काम केल्याचा अनुभव एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केला आहे. बॉलिवूड मध्ये काम करत असताना तिला आलेल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही अनुभवांबद्दल तिने भाष्य केलं आहे.(Adah Sharma Quote)
अभिनेत्री अदा शर्माने अलीकडेच सिद्धार्थ कन्नन यांच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी अदा म्हणाली, “मला या इंडस्ट्रीमध्ये अनेक चांगले लोक भेटले. जर तुमचा दिग्दर्शक चांगला असेल, तर तुम्ही कोणत्याही भाषेतील चित्रपटात काम करू शकता. इंडस्ट्रीमध्ये काम करताना चांगले-वाईट दोन्ही लोक मला भेटले. महिला कलाकारांनी समान मानधनाच्या मागणीपूर्वी सर्वप्रथम बॉलीवूडमधील लैंगिक भेदभावाबाबत भाष्य केले पाहिजे.”
अदा यापुढे बोलताना म्हणाली, “शूटिंगसाठी आधी हिरॉईनला सेटवर बोलवतात, मग खूप वेळ थांबवतात. सर्व चौकशी करून हिरोचा मॅनेजर सेटवर येतो. त्यानंतर हिरोचे आगमन होते, परंतु या सगळ्यात हिरॉईन खूप आधीपासून सेटवर उपस्थित असते याकडे कोणीही पाहत नाही. हा भेदभाव बॉलीवूडमध्ये प्रकर्षाने जाणवला. अशा वातावरणात काम करायला मला अजिबात आवडत नाही.”(Adah Sharma Quote)
‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर अदा शर्मा लवकरच आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेबरोबर अदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘द गेम ऑफ गिरगिट’या चित्रपटातून ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
