शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दादा कोंडकेंचे ‘हे’ जुबली स्टार चित्रपट दाखवण्यावर उषा चव्हाण यांचा आक्षेप; उपमुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

सौरभ जाधवby सौरभ जाधव
ऑगस्ट 5, 2023 | 4:27 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
dada kondke and usha chavan movies

dada kondke and usha chavan movies

विनोद म्हणजे माणसाचं आयुष्य वाढवण्याचं एक उत्तम साधन आहे असं मानलं जातं. मनोरंजनाच्या माध्यमातून हसण्याचं आणि हसवण्याचं काम अनेक कलाकार मंडळींकडून केलं जातं. प्रेक्षकांच्या आयुष्यात निव्वळ हास्य पेरण्याचं काम केलं ते म्हणजे स्वर्गीय अभिनेते दादा कोंडके यांनी. नाटक, चित्रपट, गाणं या सर्वांचं उत्कृष्ट हे दादांचं कसब. कधी चालू नाटकातून पुढच्या नाटकाचा विषय काढणं असो किंवा आभाळातून बरसणाऱ्या एका थेंबावरून ‘ढगाला लागली कळ’ हे गाणं लिहिणारे दादा आपण सर्वांनीच पाहिले आहेत. केवळ चित्रपटचं नाही तर दादांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचे असंख्य प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पार पडत होते. दादांचे बहुतांश चित्रपट हे सिल्वर जुबली ठरले. अशोक सराफ, निळू फुले, उषा चव्हाण यांसारख्या कलाकार मंडळींसोबत दादा कोंडके यांनी अनेक चित्रपट केले. (dada kondke and usha chavan movies)

दादा कोंडके यांच्या बहुतांश चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये मोठा अढथळा असाच तो म्हणजे सेन्सॉर. कधी चित्रपटांच्या नावामुळे तर कधी चित्रपटातील संवादामुळे दादा कोंडके यांच्या चित्रपटाला मान्यता मिळत न्हवती. तरीही दादा आणि त्यांच्या चित्रपटांच्या चाहत्यांमध्ये कोणतीही घट झाली नाही याउलट दादांच्या चित्रपटांची मागणी वाढू लागली. काही दिवसांपूर्वी दादांचे असेच काही गाजलेले आणि सिल्वर जुबली ठरलेले चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय झी टॉकीज वाहिनेने घेतला. ६ ऑगस्ट पासून दादांचे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. मात्र यावर आता अभिनेत्री उषा चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे.

म्हणून उषा चव्हाण यांचा चित्रपट प्रदर्शनावर आक्षेप (dada kondke and usha chavan movies)

दादा कोंडके यांच्या अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख नायिकेची भूमिका अभिनेत्री उषा चव्हाण यांनी साकारकली आहे. दादा कोंडके यांच्या अनेक चित्रपटांमध्ये सहनिर्माती म्हणून देखील उषा चव्हाण यांनी भूमिका निभावली. या हक्का नुसार उषा चव्हाण यांनी झी टॉकीज वर दाखवण्यात येणाऱ्या या चित्रपटांवर आक्षेप घेत परवानगीशिवाय चित्रपटाचे हक्क वापरल्याची तक्रार केली आहे. उषा चव्हाण यांचा मुलगा हृदयनाथ कडू देशमुख यांनी दादा कोंडके यांचे नातेवाईक माणिक मोरे आणि पद्माकर मोरे यांचा हक्कभंगाची नोटीस ई-मेलद्वारे कळवली आहे. मोरे आणि दादा कोंडके ट्रस्ट यांच्यात १७ चित्रपटांबाबत वाद आहे यामधील १३ चित्रपट ते कसे विकू शकतात असा आरोप हृदयनाथ देशमुख यांनी केला आहे त्याच बरोबर या संबंधी तक्रारींचे एक पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, अजित पवार तसेच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देखील पाठवलं असल्याचं बोललं जातंय.(dada konkde silver jubliee movies)

उषा चव्हाण यांच्या कुटुंबियांकडून दादा कोंडके यांच्या सासऱ्याचे धोतर, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुदल्या, पळवा पळवी, अशा आणखी चित्रपटांचे हक्क उषा चव्हाण यांच्याकडे असल्याचं सांगितलं जातं आहे. दादा कोंडके व उषा चव्हाण ही जोडी त्या काळी प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणून ओळखली जायची. गनिमी कावा, पळवा पळवी, सासऱ्याचे धोतर, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. दादा कोंडके व उषा चव्हाण यांची प्रमुख भूमिका असलेले अनेक चित्रपट आजही तितक्याचं उत्साहाने पाहिले जातात.

Tags: dada konkde moviesusha chavan and dada konkde moviesusha chavan movies
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Historical Movie Update

ऐतिहासिक चित्रपटात मृणाल कुलकर्णींसह लेक व सूनही काम करताना दिसणार, म्हणाल्या, "आमचं कुटुंब…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.