लग्नानंतर साजरी होणारी पहिली मकरसंक्रांत खास ठरते ती कपड्यांची खरेदी, हलव्याचे दागिने आणि हळदी कुंकू समारंभामुळे… मराठी मनोरंजन अनेक मराठी अभिनेत्रींची यंदाची पहिली मकरसंक्रांत आहे. पूजा सावंत, प्रथमेश-क्षितिजा, सुरुची-पियुश, स्वानंदी-आशीष या कलाकारांनी यंदाची पहिली मकरसंक्रांत साजरी केली. अभिनेत्री तितीक्षा तावडेनेही यंदा तिची पाहिली मकरसंक्रांत साजरी केली आणि याचे काही खास फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिच्याबरोबर नवरा सिद्धार्थ बोडकेही दिसत आहे. (Titeeksha Tawde Siddharth Bodke first Makar Sankranti)
छोट्या पड्यावरील एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ बोडके व अभिनेत्री तितीक्षा तावडे. काही दिवसांपूर्वी या जोडप्याने एकमेकांसह विवाहगाठ बांधत त्यांच्या नवीन आयुष्याला सुरवात केली आहे. सिद्धार्थ व तितीक्षा यांच्या लग्नाच्या तसेच लग्नापूर्वीच्या विधींचेही फोटो सोशल मीडियावर वायरल झालेले पाहायला मिळाले. अशातच त्यांचे पहिल्या मकरसंक्रांतीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
मरसंक्रांतीनिमित्त तितीक्षाने काळ्या रंगाची नारायणपेठ साडी नेसली आहे. तितीक्षाचा पती सिद्धार्थ बोडकेने मकरसंक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. ‘पहिलं हळदी कुंकू…’ असे कॅप्शन देत तितीक्षाने मकरसंक्रांतीचे फोटो शेअर केले आहेत. तितीक्षा व सिद्धार्थ सौंदर्य पांढऱ्या हलव्याच्या दागिन्यात खुललं आहे. तितीक्षा-सिद्धार्थच्या या फोटोवर सुरुची अडारकर, रेश्मा शिंदे, हृता दुर्गुळे, खुशबू तावडे, ऐश्वर्या नारकर, रेणुका शहाणे यांसारख्या अनेकांनी कमेंट करत कौतुक केलं आहे.
दरम्यान, तितीक्षाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिची मुख्य भूमिका असलेली झी मराठी वहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मनोरंजन विश्वात तितीक्षा सध्या सक्रीय नसली तरी ती तिच्या युट्यूब चॅनेलद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. यावर ती तिचे अनेक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्यामुळे आता अभिनेत्री कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार यांची सर्वजण वाट पाहत आहेत.