सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याची. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळयाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावत या कार्यक्रमाची शोभा वाढविली. या सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांचीही हजेरी खास आकर्षणाची बाब ठरली. पुरस्कार सोहळ्यामध्ये कलाकारांच्या लूकचीही जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. कलाकारांचे रेड कार्पेट लूक विशेष चर्चेत राहिले. आज झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याचं खास प्रदर्शन झी मराठी वाहिनीवर होणार आहे. (Swanandi Tikekar)
या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटच्या सूत्रसंचालनाची धुरा मराठमोळी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने उत्तमरीत्या पेलवली. बऱ्याच दिवसानंतर स्वानंदीला पाहणं प्रेक्षकांनाही रंजक ठरलं. लग्नानंतर स्वानंदीने मालिकाविश्वातून काहीसा ब्रेक घेतला असल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पहिल्यांदा स्वानंदी झी वाहिनीच्या रेड कार्पेटवर हजेरी लावताना दिसली. लग्नानंतर स्वानंदीने हे पाहिलं रेड कार्पेट आहे ज्याला हजेरी लावली.
यावेळी स्वानंदीच्या चमकदार अशा साडीमधील लूकनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अभिनयाशिवाय स्वानंदीला गायनाची व सूत्रसंचालनाची आवड आहे. बरेचदा कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ती पेलवताना दिसते मात्र यावेळी तिने रेड कार्पेटच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी उत्तमरीत्या पेलवलेली पाहायला मिलाली. रेड कार्पेटवर काम करतानाचा अनुभव शेअर करत स्वानंदीने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
स्वानंदी हा अनुभव शेअर करत म्हणाली, “यंदाच्या ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटच मी होस्टिंग करणार आहे. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत, त्यांना प्रश्न विचारताच मी धमाल-मस्ती करणार आहे. लग्नानंतर हे माझं पाहिलं रेड कार्पेट आहे त्यामुळे मी खूप खुश आहे. आधी मी घरातून निघताना देवाला नमस्कार करून निघायचे, आता लग्नानंतर देवाला नमस्कार करून मी नवऱ्याला बाय-बाय, मिस यू असं म्हणून निघते. आपली घरी वाट बघणारं कोणीतरी आहे हे फिलिंग खूप महत्वाचं आहे. रेड कार्पेटवर मी अँकरिंग पहिल्यांदा केलं आहे. याआधी मी रेड कार्पेट नाहीतर बरेच इव्हेंट्स केले होते. हे काम करताना खूप मज्जा आली. मी खूप दमले, खूप इंटरव्ह्यू घेतले, पण हे माझं काम आहे त्यामुळे मी दमले असं म्हणणार नाही, कारण माझं कोणतंही काम करायला मला शेवट्पर्यंत आवडतं. मला सगळ्यांचे इंटरव्ह्यू घ्यायला खूप आवडलं. इंटरव्ह्यू नाहीतर मी त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या. बरेच दिवसांनी सगळ्यांना भेटता आलं, त्यांच्याशी संवाद साधता आला”.