टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती. वयाच्या ११व्या वर्षी अभिनेत्रीने आमीर खान आणि मनीषा कोइरालाच्या ‘मन’ चित्रपटातून इंडस्ट्रीत एन्ट्री केली होती. त्यानंतर तिने काही चित्रपटांत काम केलं. रणबीर कपूरबरोबर ‘बर्फी’, सलमान खानबरोबर ‘किक’मध्ये तिने भूमिका साकारली. पण चित्रपटांत तिला फारसं यश मिळालं नाही आणि तिने टेलिव्हिजनमध्ये एन्ट्री केली आणि तुफान लोकप्रियता मिळवली. अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती गेल्या काही काळापासून प्रसिद्धीपासून दूर आहे. ती शेवटची ‘खतरों के खिलाडी’ मध्ये दिसली होती. तथापि, सुमोना अलीकडेच एका पॉडकास्टवर दिसली जिथे तिने कपिल शर्माबरोबर काम करण्याबद्दल सांगितले. (Sumona Chakravarti on working with Kapil Sharma)
अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात कशी केली आणि कपिलबरोबर कोणताही जोडीदार नसताना तिने ‘कॉमेडी सर्कस’मध्ये कपिल शर्माबरोबर कसे काम केले हेदेखील सांगितलं. सुमोनाने ‘द कपिल शर्मा शो’ मधील तिच्या प्रवासादरम्यान पाहिलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टींची आठवणही केली. अभिनेत्री तिच्या प्रवासाबद्दल बोलताना म्हणाली की, “‘द कपिल शर्मा शो’ने मला खूप नाव, प्रसिद्धी आणि पैसा दिला. मी २० वर्षांपासून अभिनेत्री म्हणून काम करत आहे. कलाकारांचे आयुष्य खूप कठीण असते. कारण त्याला अनेक परिस्थितींना तोंड द्यावे लागते”.
आणखी वाचा – गुगलवर आराध्याबद्दल चुकीची माहिती, अभिषेक-ऐश्वर्या बच्चन यांची उच्च न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?
यापुढे सुमोना म्हणाली की, “तुम्ही ज्या प्रकल्पावर पैसे कमावता ते तुम्ही काम करत असलेल्या वेळेसाठी असतात. कारण तुम्हाला माहित नसते की, ते काम किती काळ चालणार आहे”. पुढे सुमोना असं म्हणाली की, “नंतर मला ‘कॉमेडी सर्कस’मध्ये कपिलची साथीदार होण्यासाठी संपर्क साधण्यात आला. मी तो शो पाहिला नव्हता, मी शोमध्ये काम केले. पण कॉमेडी नव्हती केली. मग मी विचार केला की, मी ते करुन पाहीन आणि कपिल बरोबर एक सीझन केला आणि ही जोडी हिट ठरली”.
आणखी वाचा – मुंबईच्या रस्त्यांवर फिरणारा आदीमानव आमीर खान नाही, अभिनेत्याच्या टीमकडून खुलासा, मग ती व्यक्ती कोण?
यानंतर सुमोना म्हणाली की, “अर्चना पूरण सिंग आणि सोहेल खान यांनी मला त्यावेळी सांगितले होते की, कपिलच्या साथीदारांनी मध्येच त्याची साथ सोडली किंवा त्यांना बाहेर काढले गेले, कोणीही टिकून राहिले नाही. मी पहिली होती जी तिथे वर्षानुवर्षे टिकून राहिली. ‘द कपिल शर्मा शो’साठी, दुसऱ्या कोणासोबत मॉकशूट केले होते, पण नंतर त्यांनी मला शोमध्ये आणण्यास सांगितले. त्यामुळे राम कपूरची बहीण असण्यापासून, मी कपिल शर्माची पत्नी झाले”.