‘राजा राणीची ग जोडी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार.

या मालिकेत शिवानीने संजू नावाचे पात्र साकारले होते. गावातील एक सर्वसामान्य स्त्रीमध्ये आलेल्या संकटाना सामोरं जाण्याचं बळ कस असत याची कथा या मालिकेत पाहायला मिळाली. (Shivani Sonar Photoshoot)

या मालिकेमुळेच शिवानी सोनारला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेला संपून बराच वेळ झाला असला तरी चाहते अजूनही शिवानीवर प्रेम करतायत.

शिवानी ‘राजा राणीची ग जोडी’ मालिकेनंतर कोणत्याही नव्या प्रोजेक्टमध्ये झळकलेली नाही. अशातच ती तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावरून संपर्कात राहत असते.(Shivani Sonar Photoshoot)

सोशल मीडियावरही शिवानीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अशातच शिवानीने शेअर केलेल्या एका फोटोशूटच्या फोटोंनी सोशल मीडियावर हवा केली आहे.

‘बाकी सब मोह माया है।’ असं म्हणत शिवानीने निळ्या रंगाच्या साडीतील काही फोटोस शेअर केले आहेत.

यांत शिवानीचा मराठमोळा लूक अधिक भावतोय. (Shivani Sonar Photoshoot)

तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर एका चाहत्याने कमेंट करत लिहिलंय, पहिला फोटो पाहून संजुची आठवण आली.

कमेंटवरून चाहते शिवानीला मिस करताना दिसत आहेत. आता शिवानी कोणत्या नव्या चित्रपटातून झळकणार याकडे साऱ्यांचा नजरा वळून राहिल्या आहेत.
