किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकर, शाल्व किंजवडेकर, राजस सुळे यांच्यानंतर अभिनत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुले लग्नबंधनात अडकणार आहे. ९ एप्रिलला अंबर गणपुळेशी साखरपुडा झाला होता. कुठलाही गाजावाजा न करताना शिवानी व अंबरने गुपचूप साखरपुडा केला होता. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यांच्या घरी लग्नविधींना सुरुवात देखील झाली आहे. शिवानी सोशल मीडियावर मुंडावळ्या बांधून काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र शिवानीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. नुकतंच शिवानीचं लग्नाआधीचा अष्टवर विधी सोहळा पार पडला आणि यानिमित्त तिने एक खास पोस्ट शेअर केली होती. (Shivani Sonar Dance Video)
अशातच तिने नुकताच शेअर केलेला व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवानीने ‘टीम ब्राइड’सह ‘खंडेरायाच्या लग्नाला’ गाण्यावरचा रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवानीच्या कुटुंबियांचा उत्साह शिगेला पोहोचला असून कुटुंबियांचा हटके डान्सही या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. कुटुंबियांबरोबर रील शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘उत्साही कार्यकर्ते’ असं लिहिलं आहे. या व्हिडीओला तिच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी शिवानीलं शुभेच्छाही दिल्या आहेत.
आणखी वाचा – लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचे अपघाती निधन, ऑडिशनसाठी जात असताना ट्रकने चिरडलं अन्…; कुटुंबियांवर शोककळा
नुकत्याच पार पडलेल्या अष्टवर सोहळ्यात शिवानीने लाल रंगाची काठपदरची साडी, त्यावर मोत्याचे व पारंपरिक दागिने परिधान केले होते. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. तर तिच्या कपाळावरील मुंडावळ्यांनी तर शिवानी नवरी मुलीच्या वेशात खूपच सुंदर दिसली. अशातच तिच्या कुटुंबियांबरोबरच्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
दरम्यान, ‘रंग माझा वेगळा’, ‘दुर्वा’, ‘लोकमान्य’ या मालिकांमधून अंबर गणपुळेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तर ‘राजा राणीची गं जोडी’ आणि ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकांमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. काही दिवसांपूर्वीच ‘रंग माझा वेगळा’च्या संपूर्ण टीमने शिवानी व अंबर यांच्या केळवण साजरे केले होते.