Shivani Sonar & Ambar Ganpule Wedding : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडीपैकी एक म्हणजे अभिनेता अंबर गणपुळे व अभिनेत्री शिवानी सोनार. अखेर ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. आज दिनांक २१ जानेवारी रोजी शिवानी व अंबर यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. अखेर शिवानी व अंबर यांनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नसोहळ्यातील पहिला फोटो समोर आला आहे. बरेच दिवसांपासून शिवानी व अंबर यांची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत होती. अखेर आता दोघेही विवाहबंधनात अडकले असल्याचं समोर आलं आहे. शिवानी व अंबर यांनी अगदी थाटामाटात त्यांचं लग्न केलं असल्याचं फोटोंवरुन समोर आलं आहे. या जोडीच्या लग्नाच्या प्रतीक्षेत अनेक चाहते होते.
शिवानी व अंबर यांनी पारंपरिक अंदाजात विवाहसोहळा उरकला आहे. अगदी थाटामाटात हा लग्नसोहळा पार पडला आहे. यावेळी शिवानी व अंबर यांचा मराठमोळा व पारंपरिक लूक लक्षवेधी ठरत आहे. यावेळी शिवानीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे आणि त्यावर घातलेले भरजरी दागिने या लूकची शोभा वाढवत आहेत. तर अंबरने फिकट गुलाबी रंगाचा सदरा आणि त्यावर फिकट हिरव्या रंगाचं धोतर परिधान केलं आहे. दोघेही या नववधूवराच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.
तर शिवानी व अंबरजवळील गुलाबी रंगाच्या शेल्याने दोघांच्या लूकमध्ये भर घातली आहे. लग्नापूर्वी त्यांच्या संगीत सोहळ्याचे तसेच हळदी समारंभाचे अनेक फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. तसेच त्यांच्या केळवणाचे फोटोही विशेष चर्चेत राहिले. विशेषतः रंग माझा वेगळा मालिकेच्या टीमने शिवानी व अंबर यांचं खास केळवण केलं. त्याचे फोटो, व्हिडीओही बरेच व्हायरल झाले.
शिवानी व अंबर हे दोघंही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. आजवर दोघांनीही अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या दोघांनी गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. राजा राणीची गं जोडी या मालिकेमुळे शिवानीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तर अंबर ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत झळकला होता.