Sharmila Shinde Shares Experience : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका काही दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेतील लीला-एजेच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. तर दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती या तीन सूनांच्या भूमिकाही विशेष गाजल्या. या मालिकेत दुर्गा या सूनेने तिच्या खलनायिके अंदाजानं प्रेक्षकांची मन जिंकली. ही भूमिका मालिकेत शर्मिला शिंदे या अभिनेत्रीने साकारली होती. शर्मिलाने तिच्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलं. तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक होतानाही पाहायला मिळालं. आता मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने मालिकेतील कलाकार मंडळी मालिकेदरम्यानच्या अनेक आठवणी, किस्से शेअर करताना दिसत आहेत.
शर्मिला म्हणजेच मालिकेतील दुर्गाने एका सीनदरम्यानचा किस्सा नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. ‘मराठी मनोरंजन विश्व’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शर्मिला म्हणाली, “हा सीन करताना मला खूप त्रास झाला. अर्थात, मी कधीच माझ्या कुठल्याही भूमिकेचा स्वतःला त्रास करुन घेत नाही. माझ्या स्वतःकडून काही अपेक्षा असतात आणि त्या जर पूर्ण झाल्या नाहीत, तर काम अजून चांगलं करु शकले असते, असं वाटतं तेव्हाच फक्त त्रास होतो. मग झोप लागत नाही”.
आणखी वाचा – रस्त्यावर सोडलेल्या मुलीला दत्तक घेतलं, शेवटी तिनेच आईला संपवलं, बॉयफ्रेंडच्या मदतीने केलं असं काही की…
पुढे ती म्हणाली, “इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा असं झालं की, एक सीन करताना मला प्रचंड त्रास झाला, शारीरिक त्रास झाला. माझं बाळ जातं तेव्हाचा जो सीन होता, त्या दिवशी माझा वाढदिवसही होता आणि तेव्हा मी रडले, रागावले, माझ्यामध्ये जे काही होतं ते सगळं मी त्या सीनमध्ये केलं. पूर्ण ताकद लावून तो सीन केला आणि जेव्हा तो सीन झाला तेव्हा खरोखर माझ्या पोटात दुखत होतं”. पुढे शर्मिला याबद्दल बोलताना म्हणाली, “मी खऱ्या आयुष्यामध्ये अजून आई नाही झाले. पण एक आई म्हणून मला काय वाटेल याबद्दल इतका गहन विचार केला की, त्यामुळे मला शारीरिक त्रास झाला आणि ते सीनमध्ये उतरलं. कलाकार म्हणून जेवढी माझी कुवत आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं मला समाधान आहे”.
आणखी वाचा – एकीकडे वडील गेले, अंत्यसंस्काराला जाताना लेकीनेही गमावला जीव, कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू अन्…
शर्मिलाने या मुलाखतीमध्ये या सीनमुळे तिला मिळालेल्या प्रतिसादाबद्दलही सांगितलं, ती म्हणाली, “या सीननंतर मला अनेक मॅसेज आले. सेटवरील सगळ्या मंडळींनीदेखील तो सीन खूप छान झाला होता, असं सांगितलं”.