सध्या कलाकारांच्या फोटोशूटच्या चर्चांना उधाण आलं आहे. हटके फोटोशूट करून ही कलाकार मंडळी चाहत्यांना घायाळ करत आहेत.

अशातच अभिनेत्री समृद्धी केळकरच्या फोटोशूटने सार्यांना वेड करून सोडलंय. समृद्धीने याआधीही बरच फोटोशूट केलंय. (Samruddhi Kelkar Photoshoot)

समृद्धीचा सोशल मीडियावरही खूप मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच तिच्या चात्यांसाठी काही ना काही खास पोस्ट करत असते.

अशातच समृद्धीने एक फोटोशूट केलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तिच्या अदांसोबतच तिचा मनमोहक अन्दाज पाहतच रहावस वाटतंय.(Samruddhi Kelkar Photoshoot)

लाल रंगाच्या साडीत केलेलं हे हॉट फोटोशूट मनमोहून घेतंय. समृद्धीच्या या व्हिडिओवर अनेक कलाकार मंडळींनी हार्ट ईमोजी शेअर केली आहे, तर तिच्या चाहत्यांनाही कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

समृद्धीने याआधी फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. शिवाय ती दोन कटिंग या गाजलेल्या वेब सीरिज मध्ये ही झळकली. (Samruddhi Kelkar Photoshoot)

सध्या समृद्धी मी होणार सुपरस्टार जल्लोष जुनिअर्सचा या कार्यक्रमाचं अँकरिंग करताना दिसतेय.
