टीव्ही अभिनेत्री आणि नृत्यांगना संभावना सेठच्या तब्येतीबद्दल नुकतीच एक बातमी समोर येत आहे. एका शस्त्रक्रियेसाठी तिला रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे तिने नुकतेच तिच्या व्लॉगमधून चाहत्यांना सांगितले. तिच्या या व्हिडीओमध्ये, तिने यामागील कारण स्पष्ट केले असून या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीला खूप वेदना होत असल्याचे दिसून आले. पत्नीच्या या संघर्षाच्या काळात तिचा पती अविनाश द्विवेदी तिची खंबीर साथ देत असल्याचे यामधून दिसून येत आहे.
संभावनाने चाहत्यांना तिच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती देताना असं म्हटलं की, “मला एका गोष्टीसाठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, जी बरेच दिवस पुढे ढकलली जात होते. शेवटी, माझी ही शस्त्रक्रिया होत आहे. ही एक अतिशय छोटी शस्त्रक्रिया आहे आणि यात काळजी करण्यासारखे काही नाही. माझ्या गर्भाशयात पॉलीप आहे आणि तो काढून टाकणे आवश्यक आहे”.
यापुढे ती असं म्हणाली की, “गेल्या काही काळापासून मला वेदना होत आहेत. माझ्या म्युझिक व्हिडीओच्या शूटिंगदरम्यान मला वेदना होत होत्या. परंतु मला वाटले की, मला आधी गाणे पूर्ण झाले पाहिजे आणि नंतर माझे ऑपरेशन होईल. परंतु खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि मला एका रात्रीत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घ्यावा लागला”. संभावनाच्या या व्लॉग व्हिडीओमध्ये अभिनेत्रीला तिच्या आजारपणामुळे दु:ख होत असून तिला वेदनाही होत असल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये अभिनेत्री तिला होणऱ्या वेदनांमुळे अगदी व्याकुल झालेली पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये संभावनाचा पती अविनाशने असं म्हटलं आहे की, “२०२४ या वर्षाची सुरुवात कुटुंबासाठी व कुटुंबातील प्रत्येकाच्या आरोग्याच्या बाबतीत वाईट झाली आहे. २०२४ हे आमच्यासाठी फक्त रुग्णालये आणि शस्त्रक्रियांपुरते मर्यादित आहे. आधी आमच्या पाळीव कुत्र्याची शस्त्रक्रिया करावी लागली. नंतर माझी शस्त्रक्रिया झाली आणि आता संभावना. आणि आम्हा सर्वांमध्ये, संभावनाची शस्त्रक्रिया सर्वात महत्वाची होती”. दरम्यान, अभिनेता-लेखक अविनाश द्विवेदीशी संभावनाने २०१६मध्ये लग्न केलं. सुखी संसार करत असलेल्या संभावनाला अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे.