रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आठवी-अ’ वेबसीरिजचं पहिलं वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, ‘मन वाऱ्यासंग झुलतया’वर थिरकले कलाकार, पाहा खास व्हिडीओ

Saurabh Moreby Saurabh More
जून 10, 2024 | 1:42 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Its majja original Series aathvi-A Man Varyasang Jhulataya first song out now

'आठवी-अ' वेबसीरिजचं पहिलं वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, 'मन वाऱ्यासंग झुलतया'वर थिरकले कलाकार, पाहा खास व्हिडीओ

‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शन व ‘इट्स मज्जा’ ओरिजिनल यांच्या ‘आठवी अ’ या सीरिजने मनोरंजन विश्वात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या आभ्या व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट या सीरिजद्वारे सांगण्यात आली आहे. 

या सीरिजचे आतापर्यंत एकवीस भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या सीरिजच्या प्रत्येक भागाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळत आहे.  ही सीरिज प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. या सीरजमध्ये येणाऱ्या अनेक ट्विस्ट्स व रंजक वळणांमुळे या सीरिजविषयी जाणून घेण्यात प्रेक्षक कायमच उत्सुक असतात. प्रेक्षकांच्या याच उत्सुकतेत आणखी भर घालण्यासाठी या सीरिजचं पहिलं वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर शाळेची सहल गेली असल्याचे कथानक सध्या सुरु आहे आणि याच सहलीवर एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मन वाऱ्यासंग झुलतया’ असं या गाण्याचं नाव असून गायक सार्थक शिंदे व गायिका अनुजा पांचाळ यांनी हे गाणं गायलं आहे. समीर पठाण यांनी या गाण्याचे गीतलेखन केले आहे. तर या गाण्याला चाल संगीतकार मंदार पाटील यांनी दिली आहे.

आणखी वाचा – वैष्णोदेवी दहशतवादी हल्याप्रकरणी मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांनी व्यक्त केला राग, सोशल मीडियावर भयावह दृश्य शेअर करत म्हणाले…

‘मन वाऱ्यासंग झुलतया’ या गाण्यात आभ्या व त्याच्या मित्रांची धमाल मजा व मस्ती पाहायला मिळत असून या सहलीच्या गाण्याबरोबरच रसिकांना लालपरीतून गावखेड्याचे निसर्गसौंदर्यही अनुभवायला मिळणार आहे. या गाण्यातून प्रत्येकाच्या शाळेतील काही जुन्या आठवणी ताज्या होणार आहेत. ‘आठवी-अ’ या सिरिजप्रमाणेच ‘मन वाऱ्यासंग झुलतया’ हे नवीन गाणंही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल यात काहीच शंका नाही.  

आणखी वाचा – “नुकतीच माझी आई गेली…”, सविता मालपेकरांच्या आईचं निधन, तरीही शूट करत आहेत अन्…; म्हणाल्या, “दुःख आहेच पण…”

‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनेलवर हे नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. दरम्यान, ‘आठवी-अ’ या सीरिजची कथा, संवाद व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले आहे. तर पटकथा नितीन वाडेवाले व नितीन पवार यांनी लिहिली आहे. त्याचबरोबर अनंत श्रीवास्तवा व जैमिन शिगवण हे या सीरिजचे  प्रोजेक्ट प्रमुख आहेत. तर क्रिएटिव्ह हेड अंकिता लोखंडे असून फायनान्सचा पदभार विशाल मेनारिया यांनी स्वीकारला आहे.

Tags: Its Majja Aathvi-A SeriesMan Varyasang Jhulatayamarathi entertainment newsnew song
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Mrinal Kulkarni Wedding Anniversary

१९व्या वर्षी लग्न, ३४ वर्ष सुखाचा संसार; मृणाल कुलकर्णींनी लग्नाच्या वाढदिवसाला शेअर केले खास फोटो, अभिनेत्रीच्या पतीला पाहिलंत का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.