शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रिंकू राजगुरूचा भाजप खासदाराच्या लेकाबरोबरचा फोटो व्हायरल, दोघांना एकत्र पाहून चर्चांना उधाण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 11, 2025 | 10:31 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rinku Rajguru Photo With Krishnaraaj Mahadik 

रिंकू राजगुरूचा भाजप खासदाराच्या लेकाबरोबरचा फोटो व्हायरल, दोघांना एकत्र पाहून चर्चांना उधाण

Rinku Rajguru Photo With Krishnaraaj Mahadik  : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सुपरहिट ‘सैराट’ चित्रपटातून नावारूपास आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूची क्रेझ आजही कायम आहे. सैराटनंतर रिंकू काही चित्रपटांमध्ये झळकली असली, तरी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत राहते. रिंकू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून इन्स्टाग्रामद्वारे ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतचे फोटोज व व्हिडीओ तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच रिंकू पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. ही चर्चा एका वेगळ्याच कारणामुळे रंगली आहे. कारण अभिनेत्रीने कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले मात्र यावेळी तिच्याबरोबर खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिकही दिसला. त्यामुळे या दोघांच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

कृष्णराजच्या कार्यालयाच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या मंदिराबाहेर दोघांचा फोटो आहे. “अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले”, असं कॅप्शन देत कृष्णराज व रिंकू यांचा दर्शनांनंतरचा फोटो समोर आला आहे. दोघांचा एकत्रित हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केलेल्या पाहायला मिळत आहेत. ‘झालं झिंग झिंग झिंगाट…’, ‘साहेबांना नाहीतर आईना पाठवा हा फोटो जरा कोणी तरी’, ‘थोड्या वेळासाठी वाटलं तुमचं लग्नच ठरलं की काय’, ‘वहिनी आहे काय’ अशा कमेंट करत सोशल मीडियावर गदारोळ माजला आहे.

आणखी वाचा – ‘चिकी चिकी बुबूम बुम’ मध्ये रंगणार धमाल रियुनियन पार्टी, टायटल साँगने वेधलं लक्ष, कलाकारांचा तुफान डान्स व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Krishnaraaj Mahadik’s Office (@km.office)

कृष्णराज महाडिक हा कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा धाकटा मुलगा आहे. तर महादेवराव महाडिक उर्फ अप्पा यांचा चुलत नातू. कोल्हापूरच्या राजकारणात महाडिक कुटुंबाचे नाव मोठे आहे. महादेव महाडिक यांचे सुपुत्र अमल महाडिक, तर पुतणे धनंजय महाडिक. धनंजय महाडिक सध्या भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेवर खासदार आहेत. याआधी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ते कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते.

आणखी वाचा – रणवीर अलाहाबादियाचं ‘ते’ आक्षेपार्ह विधान कोणतं?, शेवटी मागावी लागली माफी, प्रकरण तापलं

कृष्णराज महाडिक सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो, त्याचं स्वतःचं यूट्युब चॅनलही आहे. या चॅनलवर तो महाडिक कुटुंबातील बऱ्याच गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. त्यामुळे कृष्णराज महाडिकला महाराष्ट्राबाहेरही ओळख मिळाली आहे.

Tags: Marathi newsRinku Rajguru Photo With Krishnaraaj MahadikRinku Rajguru viral photo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
India Got Latent Controversy

रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्या विरोधात तक्रार दाखल, पालकांबद्दल अश्लील गोष्टी बोलणं पडलं महागात

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.