गुरूवार, एप्रिल 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मुलगा आमच्याबरोबर नाही याचं वाईट वाटतं पण…”, निवेदिता सराफ यांनी मुलाविषयी व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, “कितीही वाटलं तरी…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 1, 2024 | 12:21 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Actress Nivedita Saraf expressed her feelings about her son Aniket in interaction with Itsmajja

परेदशात शिकणाऱ्या आपल्या अनिकेत मुलाविषयी निवेदिता सराफ यांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या...

आयुष्यभर खस्ता खाऊन आई-वडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात. मुलं शिकून स्वत:च्या पायावर उभी रहातात, त्यांच्या संसारात रमूनही जातात. आई-वडील मात्र घरच्या जबाबदारीतून कधीही रिटायर होत नाहीत. मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांची नोकरी, त्यांचं लग्न आणि नंतर नातवंडं एकामागोमाग येणाऱ्या या जबाबदारीच्या चक्रात ते नकळतपणे अडकून जातात. या आई आणि बाबांवर भाष्य करणारी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि या मालिकेचे नाव म्हणजेच ‘आई आणि बाबा रिटायर होत आहे’. (nivedita saraf on son aniket saraf)

या मालिकेतून अभिनेत्री निवेदिता सराफ व अशोक कदम ही कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. मालिकेतून आईबाबा आणि मुलं यांच्या नात्यावर भाष्य करण्यात येणार असल्याचे प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. निवेदिता यांचा मुलगाही सध्या कामानिमित्त परदेशात आहे. तर अनिकेतला भारतातील आई-बाबा म्हणजेच निवेदिता व अशोक सराफ यांची आठवण येते का? आणि निवेदिता व अशोक सराफ यांनाही त्यांची आठवण येते का? यावर भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – “माझ्या पदार्पणाची मालिका आणि…”, मालिका संपताच अभिनेत्याला भावना अनावर, म्हणाला, “विचित्र मार्गाने संधी येते पण…”

मालिकेनिमित्त निवेदिता यांनी इट्स मज्जाशी संवाद साधला. यावेळी निवेदिता यांनी असं म्हटलं की, “अनिकेतची नोकरी परदेशात आहे, त्यामुळे त्याला कितीही वाटलं तरी तो पटकन उठून येऊ शकत नाही. त्याचा नवा नवा जॉब आहे आणि तो त्याच्या जॉबमध्ये सेटल होतो आहे. त्याचं जग आता आमच्या पेक्षा मोठं झालं आहे. त्याला जे करायचं आहे आणि त्याचा ज्यात आनंद आहे, त्यातच आमचाही आनंद आहे. पण जग आता इतकं जवळ आलं आहे की, आम्ही त्याच्याबरोबर रोज संपर्क करत असतो”.

आणखी वाचा – मोठी बातमी! पोर्नोग्राफी प्रकरणी शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला ईडीकडून समन्स, चौकशीला हजर राहवे लागणार अन्यथा…

यापुढे निवेदिता असं म्हणाल्या की, “अनिकेत आमच्यापेक्षा लांब आहे, त्याला नेहमीच इथे येता येत नाही. त्यामुळे त्याचंच प्रतिबिंब कुठे तरी उमटलं आहे”. दरम्यान, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत निवेदिता सराफ, मंगेश कदम, हरीश दुधाडे, प्रतिक्षा जाधव असे लोकप्रिय कलाकार या झळकणार आहेत. येत्या २ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येणार आहे. 

Tags: nivedita sarafnivedita saraf on son aniket sarafnivedita saraf son
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Sagar Karande
Entertainment

Video : पत्नीकडून औक्षण, केक कटिंग अन्…; ‘बिग बॉस ६’ मधून घरी परतताच सागर कारंडेचं कुटुंबियांकडून कौतुक, भावुक झाला आणि…

एप्रिल 8, 2026 | 5:35 pm
Digamber Naik Statement
Entertainment

“केदार शिंदे मिठी मारणार पण…”, इंडस्ट्रीत काम न देण्यावरुन दिगंबर नाईक स्पष्टच बोलले, म्हणाले, “फरक नाही पडत…”

एप्रिल 8, 2026 | 4:24 pm
Ghabadkund Marathi Movie
Entertainment

मराठीत पहिल्यांदाच ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; प्रितम पाटील सेट करणार नवा ट्रेंड, इमोशन, ड्रामा आणि…

एप्रिल 8, 2026 | 3:00 pm
south actress subhashini found dead 
Entertainment

मृत्यूपूर्वी नवऱ्याचा व्हिडीओ कॉल, भांडणही झालं आणि…; प्रसिद्ध अभिनेत्रीचा घरातंच सापडला मृतदेह, दोन वर्षांपूर्वी झालेलं लग्न

एप्रिल 8, 2026 | 1:25 pm
Next Post
tv actress Rubina Dilaik celebrated the first birthday of her twin daughters Jeeva and Edhaa in Shimla

रुबिना दिलैकने माहेरी साजरा केला जुळ्या मुलींचा पहिला वाढदिवस, पतीचीही खास हजेरी, गोड फोटो सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.