शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आकर्षक इंटिरिअर, प्रशस्त जागा अन्…; असं आहे मृणाल दुसानिसचं ठाण्यातील नवीन रेस्टॉरंट, पाहा Inside Video

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 18, 2024 | 10:42 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Actress Mrunal Dusanis and her husband Neeraj More started their own new restaurant together see the detals

अभिनेत्री मृणाल दुसानिसचे ठाण्यातील Belly Laughs रेस्टॉरंट नेमकं कसं आहे, पाहा खास झलक

छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार मंडळी अभिनयाबरोबरच स्वतंत्र व्यवसाय निर्मितीतही आपले नशीब आजमावत आहेत. गेल्या काही दिवसांत मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी स्वत:चा व्यवसाय उभा केला आहे. अशा अनेक कलाकारांच्या यादीत आता आणखी एक नाव सामील झालं आहे, ते म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिसचं. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत नवीन सुरुवात करणार असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. “लवकरच काहीतरी नवीन घेऊन येत आहोत. तुम्ही ओळखू शकता का नेमकं काय सुरु आहे?”, असं कॅप्शन देत तिने एका जागेचं इंटिरियर डिझायनिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. (Mrunal Dusanis New Restaurant)

अभिनेत्रीने हॉटेल व्यवसायात पदार्पण केलं असून ठाण्यात तिने स्वत:चं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. मृणाल-नीरजने रविवारी सर्वांना आनंदाची बातमी दिली. मृणाल आणि नीरज या दोघांनी ठाण्यात स्वतःचं रेस्टॉरंट सुरु केलं असून याचं नाव Belly Laughs असं आहे. कॉकटेल्स, मॉकटेल्स आणि चविष्ट जेवणाचा आस्वाद लोकांना रेस्टॉरंटमध्ये घेता येईल. ठाण्यातील हिरानंदानी भागात मृणालने हे रेस्टॉरंट उघडलं आहे. पहिल्याच दिवशी लाईव्ह संगीत आणि मराठी कलाकारांच्या उपस्थितीत या रेस्टॉरंटचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ज्ञानदा रामतीर्थकर, राजश्री निकम, वंदना गुप्ते, शर्मिष्ठा राऊत यांसह अनेकांनी रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला हजेरी लावली.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – 18 November Horoscope : सोमवारचा दिवस मिथुन व कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभाचा, तुमच्या नशिबात काय? जाणून घ्या…

यावेळी अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या. याबद्दल ती असं म्हणाली की, “मी खूप उत्सुक आहे. तसंच मनात थोडीशी धाकधुकही आहे. जसं की पहिली मालिका लॉंच होताना होतं तसंच काहीसं आताही होतं. माझं पहिलं वहिलं  रेस्टॉरंट येत आहे. तर याची उत्सुकता आणि आनंद दोन्हीही आहे”. मृणालच्या नवीन रेस्टॉरंटचं इंटिरिअर अगदीच खास आहे. उत्तम रोषणाई आणि भिंतीवरील हटके फ्रेम्सने या रेस्टॉरंटची शोभा आणखी वाढवली आहे. उत्तम आसनव्यवस्था आणि प्रशस्त जागा हे या रेस्टॉरंटचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. एकूणच आकर्षक असं हे मृणालचे नवीन रेस्टॉरंट आहे, जिथे अनेक जण अनेक पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – “संपूर्ण महाराष्ट्राला या आईने खूप काही दिलं पण…”, मालिकेला निरोप देताना ‘आई कुठे…’ फेम अरुंधतीच्या डोळ्यांत पाणी, शेअर केला भावुक व्हिडीओ

दरम्यान, मृणालने या नवीन व्यवसायासह प्रेक्षकांचे मनोरंजन करायलादेखील सुरुवात केली आहे. लवकरच ती ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत मृणालबरोबर अभिनेता विजय आंदळकर, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे हे कलाकार आहेत. येत्या १६ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ७ वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल. त्यामुळे मृणालच्या अनेक चाहत्यांची तिला पडद्यावर पुन्हा एकदा भेटण्याची उत्सुकता संपणार आहे.

Tags: marathi actressmrunal dusanisMrunal Dusanis New Restaurant
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Upcoming Marathi Movie

हास्याची मेजवानी घेऊन येणार 'गुलकंद', मराठीतील टॉपचे कलाकार दिसणार, पोस्टर समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.