शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : रात्री घरातले झोपले असताना क्रांती रेडकरच्या लेकींची करामत, ‘पप्पांनी गणपती आणला’ गाणं बोलत होत्या अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 5, 2023 | 1:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kranti Redkar Daughters

Video : रात्री घरातले झोपले असताना क्रांती रेडकरच्या लेकींची करामत, ‘पप्पांनी गणपती आणला’ गाणं बोलत होत्या अन्...

अभिनयाने व आपल्या उत्तम नृत्यशैलीने क्रांती रेडकर हिने मराठी सिनेसृष्टीमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. क्रांती रेडकर कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. विशेषतः ती त्यांच्या लेकींमुळे चर्चेत असते. क्रांतीला जुळ्या मुली आहेत. झिया व झिदा अशी तिच्या मुलींची नाव आहेत. क्रांती नेहमीच तिच्या मुलींमुळे विशेष चर्चेत असते. क्रांतीच्या लेकीही तिच्यासारख्याच एन्जॉय करताना दिसतात. (Kranti Redkar Daughters)

सोशल मीडियावर क्रांती नेहमीच सक्रिय असते. ट्रेंडिंग रील्स शेअर करत ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर क्रांती तिच्या मुलींबरोबर धमाल मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओज शेअर करते. नुकताच क्रांतीच्या लेकींचा पाचवा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त क्रांतीने लेकींसाठी खास पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर क्रांतीने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – Video : …अन् मन्नारा चोप्राने अंकिता लोखंडेच्या तोंडावर फेकली कॉफी, अभिनेत्री नवऱ्यासमोर ढसाढसा रडली, म्हणाली, “अशा लोकांबरोबर…”

क्रांतीने तिच्या गोंडस लेकीबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये क्रांतीच्या लेकी गाणं गाताना दिसत आहेत. क्रांतीने हा व्हिडीओ शेअर करत, “रात्रीच्या १ वाजता आमच्याकडे काय सुरु आहे पाहा असं म्हणत लेकी गाणं गाताना दाखवल्या आहेत. बर्थडे पार्टी संपल्यानंतर त्या ‘पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यावर सूर धरताना दिसत आहेत. क्रांतीने तिच्या लेकींचा हा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांनी या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद दिलेला पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

आणखी वाचा – “आमच्या इथे तर काळं कुत्र नाही…”, ‘झिम्मा २’ हाऊसफुल म्हणताच नेटकऱ्याची कमेंट, हेमंत ढोमे संतापला, म्हणाला, “सिनेमा माणसांसाठी…”

क्रांतीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. एका युजरने कमेंट करत, “आपल्या पुढच्या होणाऱ्या भावी गायिका आहेत. रंगीत तालीम सुरू केली” अशी गमतीशीर कमेंट केली आहे. तर एकाने कमेंट करत “किती गोड आहेत त्या” अशी कमेंट केली आहे.

Tags: entertainmentkranti redkarkranti redkar daughterkranti redkar kidskranti redkar videomarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
bollywood actor junior mehmood suffering from cancer and he wants to meet sachin pilgaonkar

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याची कर्करोगाशी झुंज, शेवटचे फक्त ४० दिवस उरले?, सचिन पिळगांवकरांना भेटण्याची इच्छा आहे अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.