मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री, तसेच निर्माती क्रांती रेडकर ही तिच्या अभिनयाबरोबरच सोशल मीडियाद्वारे अनेकदा चर्चेत असते. अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या अभिनयाने व नृत्यकौशल्याने अनेकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. क्रांती ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तसंच ती लेक व पती समीर वानखेडे यांचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. क्रांती व समीर यांचा अनोखा बॉण्ड चाहत्यांनाही विशेष आवडतो. अशातच क्रांतीने समीर यांच्याबद्दल एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. (Sameer Wankhede Birthday)
क्रांतीने समीर यांच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये समीर तिचे पती यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी फटाके फोडले. याचीच खास झलक क्रांतीने शेअर केली आहे. तसंच या सर्वांना तिने धन्यवादही म्हटलं आहे. त्यांच्या फटाके फोडण्याबरोबरच क्रांतीने नवऱ्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. “हॅप्पी बर्थडे टु यु” असं म्हणत क्रांतीने नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या खास व्हिडीओसह क्रांतीने या व्हिडीओखाली असं म्हटलं आहे, “समीर वानखेडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे खूप खूप आभार… हे एक सुखद आश्चर्य होते. तुम्ही सर्व आमच्यासाठी खूप अर्थपूर्ण आहात”. तसंच या क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडीओखालीही अनेकांनी “वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा सर”, “तुम्हाला निरोगी उदंड आयुष्य मिळो हीच स्वामी चरणी प्रार्थना”, “दीर्घायुषी व्हा” अशा अनेक कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, क्रांती रेडकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनय कौशल्यामुळे चर्चेत येणारी क्रांती सध्या तिच्या वैयक्तिक जीवनामुळे जास्त चर्चेत असते. क्रांतीने २०१७ मध्ये एनसीबीचे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. क्रांती-समीर यांना जुळ्या मुली आहेत. क्रांती अनेकदा समीर यांच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच क्रांतीने व्हिडीओ शेअर करत पती समीर वानखेडेंच्या वाढदिवसाची खास झलक दाखवली आहे.