अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. अगदी गेल्यावर्षीच त्यांनी लग्नगाठ बांधली आणि त्यांच्या नव्या आयुष्याला सुरूवात केली. सोशल मीडियावर या जोडप्याची कायमच चर्चा होताना दिसते. अशातच नुकताच प्रसाद जवादेचा वाढदिवस झाला. यानिमित्ताने त्याची बायको म्हणजेच अमृता देशमुखने सोशल मीडियावर खास अंदाजात त्याला शुभेच्छा दिल्या. अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवऱ्याचे काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये प्रसादच्या वाढदिवसाची तिने जोरदार तयारी केल्याचेही पाहायला मिळाले. (Prasad Jawade birthday celebration)
प्रसादबरोबरचे काही फोटो खास फोटो शेअर करत अमृताने “रहना तू है जैसा तू, धीमा धीमा झोंका या फिर जुनून, Happy Birthday Jigglypuff ” असं म्हटलं होतं. या पोस्टला प्रसाद व अमृता यांच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला. अशातच आता अमृताने त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. अमृताने तिच्या युट्यूब चॅनेलद्वारे प्रसादच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची खास झलक दाखवली आहे. प्रसादचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अभिनेत्री त्याच्या मालिकेच्या सेटवर गेली होती.
आणखी वाचा – Video : ‘सातव्या मुलीची…’ला निरोप देताना ढसाढसा रडली तितीक्षा तावडे, सेट विस्कळीत केल्यानंतर कलाकारांना दुःख
प्रसादच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी अमृता थेट साताऱ्यात ‘पारू’ या मालिकेच्या सेटवर गेली होती. यावेळी मालिकेच्या सेटवर प्रसादच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन झाल्याचे पाहायला मिळाले. या व्हिडीओमध्ये प्रसाद बाइकवरुन ग्रँड एन्ट्री घेतो. त्यानंतर बायकोबरोबर तो केक कट करतो. त्याच्या वाढदिवसानिमित्त मालिकेची संपूर्ण टीम तिथे हजर असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तसंच खास सजावट व रोषणाईही केली असल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे.
आणखी वाचा – Paataal Lok या लोकप्रिय वेबसीरिजचा दूसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, कधी प्रदर्शित होणार?
मालिकेवर प्रसादच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन झाल्यानंतर तो बायको अमृताबरोबर बाहेर जेवायलाही गेला असल्याचे अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओमधून दिसत आहे. यावेळी त्याला छोट्या चाहत्याही भेटतात. यानंतर अमृताने दुसऱ्या दिवशी तिच्या भावाचा वाढदिवसही साजरा केला. आई कुठे काय करते फेम अभिनेता अभिषेक देशमुख हा अमृताकहा भाऊ असून त्याच्या वाढदिवसाचीही खास झलकही अमृताने तिच्या या युट्यूब व्हिडीओमधून दाखवली आहे.