प्रत्येकाच्या आयुष्या सोबत एक पूर्णविराम ही लिहिलेला असतो. तो पूर्णविराम कोणत्या वळणावर दिसून येईल सांगता येतं नाही. असच काहीसं झालं अभिनेते, निर्माते सतीश कौशिक यांच्या सोबत. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मिस्टर इंडिया चित्रपटातील त्यांचं कॅलेंडर हे पात्र विशेष गाजलं या सोबतच राम लखन, दिवाणा मस्ताना अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी हटके अंदाजात अभिनय सादर करत प्रेक्षकांची मन जिंकली.

अभिनया सोबतच त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन ही केले. रूप कि राणी चोरो का राजा, हमारा दिल आपके पास है, मुझे कूच केहना है, बधाइ हो बधाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिगदर्शन सतीश यांनी केले आहे. १९८३ पासून सुरु झालेला सतीश यांचा हा अभिनित प्रवास अखेर २०२३ मध्ये थांबला.
=====
हे देखील वाचा- IIT मद्रासमध्ये घुमणार ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या’ नावाचं वादळ
=====
फक्त दिगदर्शन किंवा अभिनयापर्यंत मर्यादित न राहत सतीश यांनी अनेक चित्रपटांच्या निर्मितीत हि सहभाग नोंदवला ढोल, कागज अशा अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांच्या हातून झाली होती.

अभिनय विश्वात सतत लखलखत राहणार हा अभिनेता आज हरपला त्यामुळे संपूर्ण बॉलीवूड विश्वावर शोककळा पसरलेली दिसत आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी हि शोकांतिका व्यक्त करत ट्विट केले आहे.
या हरहुन्नरी नटाच्या आत्म्यास शांती लाभो.