बॉलीवूड मधला प्रसिद्ध हिरो कोण असं कोणी विचारलं कि पहिल्या काही नावांमध्ये एक नाव हमखास घेतलं जात ते म्हणजे भाईजान म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमान खानचं. अनेक जुने हिंदी चित्रपट ते आताचा ‘किसी का भाई किसी कि जान’ सगळ्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने सलमानने भुरळ घातली आहे.(Salman Khan Wedding)
सलमान खान आपल्या दबंग शैली साठी जगभर प्रसिद्ध आहे. सलमानचा प्रत्येक अंदाज चाहत्यांना नेहमीचं आकर्षित करत असतो. बॉडीगार्ड, दबंग, राधे, अशा अनेक चित्रपटांमधील भूमिकेसाठी सलमान खान अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. सलमानच्या एवढ्या मोठ्या कारकिर्दीत एक प्रश्न त्याला नेहमी विचारला जातो तो म्हणजे त्याच्या लग्नाचा.

पुन्हा एकदा हा प्रश्न सलमान खान ला विचारण्यात आला आहे तो म्हणजे IIFA अवॉर्ड्स २०२३ च्या रेड कार्पेट वर. रेड कार्पेट दरम्यान एका मुलीने सलमानला चक्क लग्नाची मागणी घातली त्यावर सलमानच्या उत्तराने सगळ्यांची बोलती बंद केली सलमान या प्रश्नाच्या उत्तरादखल बोलताना म्हणाला ” माझं लग्न करण्याचा काळ आता संपला आहे. तू मला २० वर्ष आधी भेटायला हवं होतस”.(Salman Khan Wedding)
पहा नक्की काय घडलं खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक वर क्लीक करून
https://www.instagram.com/reel/CsuE5DJIzad/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
सलमानचा हाच दिलखुलास स्वभाव अनेकांना आवडतो. सलमानचा नुकताच रिलीज झालेला किसी का भाई किसी कि जान हा चित्रपट जास्त चालला नाही तरीही चर्चेत मात्र बराच राहिला. त्याचबरोबर टायगर, टायगर जिंदा हे या स्पाय सिरीज चित्रपटाचा तिसरा भाग टायगर ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान सध्या त्या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. त्या संदर्भात त्याने मागे एक पोस्ट देखील केली होती.