Prasad Oak New Movie: मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या एकापेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.’बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने यशाचं शिखर गाठलं आहे. त्यापाठोपाठ, ‘अफलातून’, ‘आणीबाणी’ यांसारख्या चित्रपटांनी देखील प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. सध्या मराठी चित्रपटांची चलती आहे. अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काल्पनिक कथांसोबत खऱ्या आयुष्यात घडलेल्या कथा प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सिनेसृष्टीमध्ये जोर धरू लागला आहे.(Prasad Oak New Movie)
अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक कायमच प्रेक्षकांसाठी नवनवीन चित्रपट घेऊन येत असतात. ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ या चित्रपटांच्या यशानंतर ‘धर्मवीरच्या’ माध्यमातून आनंद दिघे प्रसाद यांनी आपल्या भूमिकेतून डोळ्यासमोर उभे गेले. त्यांच्या ‘धर्मवीर’ मधील भूमिकेसाठी प्रसाद ओक यांचं विशेष कौतुक झालं. यानंतर आता प्रसाद ओक नवीन भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
‘परिनिर्वाण’ चित्रपटासाठी प्रसाद ओक यांची तयारी सुरु(parinirvaan marathi movie)
‘परिनिर्वाण’ या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी पोस्टर लॉंच सोहळा पार पडला.हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. नामदेव व्हटकर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे.नामदेव व्हटकर यांची भूमिका प्रसाद ओक साकारणार आहेत. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. सध्या चित्रपटाची तयारी सुरु आहे. यासंदर्भांत प्रसाद ओक यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे.
वंदनीय बाबासाहेब आबंडेकरांच्या स्मृतीस अभिवादन करून “परिनिर्वाण” ची तयारी सुरु झाली आहे.मोठ्या जबाबदारीची जाणीव झालेली आहे.महामानवाचा आशीर्वाद पाठीशी आहेच.तुमच्या शुभेच्छांची आणि प्रेमाची गरज आहे. असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे.कलाकारांनी तसेच चाहत्यांनी ‘जय भीम तुम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात प्रमुख भूमिका करत आहात ते तुम्ही चांगल्या प्रकारे निभावणार यात शंका नाही’ असे म्हणतं प्रसाद ओक यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘परिनिर्वाण’ सोबतच प्रसाद ओक यांचा ‘वडापाव’ हा देखील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या लंडन मधील शूटचे देखील व्हिडिओज कलाकार शेअर करत असतात.(Prasad Oak New Movie)
हे देखील वाचा : प्रसाद ओक दिग्दर्शित ‘वडापाव’ या गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरीचा लंडन येथे मुहूर्त संपन्न