टी-सीरीजचे प्रमुख भूषण कुमार यांची चुलत बहीण आणि अभिनेते कृष्णा कुमार यांची मुलगी तिशा कुमार हिचे १८ जुलै रोजी कर्करोगामुळे जर्मनी येथे निधन झाले. अवघ्या वयाच्या २०व्या वर्षी तिने अखेरचा निरोप घेतला. तिचे आई-वडील कृष्ण कुमार आणि तान्या सिंग हे तिच्याबरोबर जर्मनीत राहत होते, जिथे ती तिच्या उपचारासाठी थांबली होती. मात्र, रविवारी विलेपार्ले येथील स्मशानभूमीत तिशाचा अंत्यसंस्कार होणार होता, मात्र सकाळपासून शहरात मुसळधार पावसामुळे तिचे पार्थिव घेऊन जाणारे विमान मुंबईत उतरु शकले नाही. (Tishaa Kumar Funeral)
यापूर्वी ‘झूम’च्या रिपोर्टमध्ये विमान दिल्लीला पोहोचल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर विमानप्रवास आता अहमदाबादकडे वळवण्यात आली आहे. एटीसीच्या मंजुरीनंतर ते दुसऱ्या दिवशी मुंबईत दाखल होईल. अनेकांनी अंत्यसंस्कारासाठी घर सोडण्यास सुरुवात केली होती आणि आता ते पुन्हा परतले आहेत.
झूम’ अहवालात असेही म्हटले आहे की, तिशाच्या पालकांनी निर्णय घेतला आहे की, आज सकाळी १० वाजता अंतिम संस्कार केले जातील. दरम्यान, हॉटेल सहारा स्टार (अंधेरी पूर्व) येथे आज दुपारी ४ ते ५ या वेळेत आयोजित प्रार्थना सभा वेळापत्रकानुसार चालणार आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. बॉलिवूड कलाकारांनी पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी येण्यास सुरुवातही केलेली पाहायला मिळत आहे.
तिशाचा जन्म ६ सप्टेंबर २००३ रोजी कृष्ण कुमार व तान्या सिंग यांच्या घरी झाला. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, तिशा कॅन्सरने ग्रस्त होती. मात्र, अद्याप या आजारपणाबाबतच्या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तिशा एक खासगी मुलगी होती, जी क्वचितच दिसायची. ती शेवटची नोव्हेंबर २०२३ मध्ये दिसली होती. यावेळी ती रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित होती. त्यावेळी ती तिचे वडील कृष्ण कुमार यांच्याबरोबर रेड कार्पेटवर दिसली होती.