रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अजिंक्य राऊत, ‘अभंग तुकाराम’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 22, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ajinkya Raut Chhatrapati Shivaji Maharaj role

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अजिंक्य राऊत, 'अभंग तुकाराम' चित्रपटात महत्त्वाची भूमिका

Ajinkya Raut Chhatrapati Shivaji Maharaj role : काही प्रतिभावान कलावंतांनी कठोर मेहनतीच्या बळावर इतिहासाच्या पानांमधील व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावरही अजरामर केल्या आहेत. त्यांचीच परंपरा पुढे सुरु ठेवत आता अभिनेता अजिंक्य राऊत प्रथमच मोठ्या पडद्यावर एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व्यक्तीरेखेत दिसणार आहे. आगामी ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात तरुण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तो साकारणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’ चित्रपट ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, अजय अशोक पूरकर, दिग्पाल लांजेकर असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत.

अजिंक्यने विविध मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले असून त्याला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळालं होतं. या नव्या भूमिकेविषयी विषयी सांगताना अजिंक्य राऊत म्हणाला की, “आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे हे मी भाग्यचं समजतो. ‘छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. ही व्यक्तिरेखा साकारताना जबाबदारीच भान असावं लागतं. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण टीमने ही मला उत्त्तम सहकार्य केलं आहे”.

आणखी वाचा – इतकी सुंदर व गोंडस आहे मोनिका दबडेची लेक, पहिल्यांदाच दाखवला चेहरा, हुबेहूब…

View this post on Instagram

A post shared by Ajinkya Valmik Raut (@ajinkyathoughts)

तुकारामांच्या अभंगांमध्ये अध्यात्मिकतेचा साक्षात्कार आणि जीवनाची अर्थपूर्णता याचं अत्यंत सुंदर सार दडलेलं आहे. हेच सार ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातून आपल्या समोर मांडण्यात येणार आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाचे छायांकन संदीप शिंदे यांचे आहे. संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा सौरभ कांबळे यांची आहे. संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. ध्वनी आरेखन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर यांचे आहे.

आणखी वाचा – बांदेकरांच्या लेकाच्या ‘त्या’ कमेंटने वेधलं लक्ष, सोहमने दिली पूजा बिरारीवरील प्रेमाची कबुली, चर्चेला उधाण

साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे तर कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. निर्मिती पश्चात प्रक्रिया सचिन भिल्लारे यांची आहे. व्ही एफ. एक्स ची जबाबदारी शॉक अँड ऑ फिल्म्स यांनी तर व्हिजुअल प्रमोशनची जबाबदारी कॅटलिस्ट क्रिएटस यांनी सांभाळली आहे. सिनेमन एंटरटेनमेंटचे जय गोटेचा मार्केटिंग डायरेक्टर आहेत. कार्यकारी निर्मात्या केतकी गद्रे अभ्यंकर आहेत.

Tags: ajinkya rautchhatrapati shivaji maharajmarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
asrani actor death reason

"माझे अंतिम संस्कार खासगी ठेवावेत", दिवंगत अभिनेते असरानींप्रमाणे सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा, म्हणाले, "ओझं बनून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.