शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दोन जिवांची अनोखी कथा उलगडणार ‘गौरीशंकर’ चित्रपटातून, ट्रेलरने वाढविली उत्सुकता

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 19, 2025 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gauri Shankar Movie Trailer

दोन जिवांची अनोखी कथा उलगडणार 'गौरीशंकर' चित्रपटातून, ट्रेलरने वाढविली उत्सुकता

Gauri Shankar Movie Trailer : प्रेम, अन्याय, बदला, शोध याची कुठेही कमतरता न भासू देणारा एक नवा कोरा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ऍक्शनपट अशा चित्रपटांची आता ही उणीव ‘गौरीशंकर’ हा मराठी चित्रपट भरुन काढणार आहे. या चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर लाँच करण्यात आला असून, २८ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सगळे नवोदित कलाकार असणार असून तुम्हाला चित्रपटाद्वारे नवा अनुभव देणार आहेत. तसेच या चित्रपटात नवी प्रेम कथा देखील पाहायला मिळणार आहे. अशातच चित्रपटाच्या ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. भारदस्त अशा चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपटाची ही उत्सुकता वाढविली आहे.

अॅक्शनपॅक्ड आणि टाळीबाज संवाद असलेल्या ‘गौरीशंकर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच वनमंत्री मा. श्री. गणेश नाईक यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. अन्यायाच्या बदल्याची, शोधाची, थरारक, रंजक अशी कहाणी या चित्रपटातून पहायला मिळणार असून, २८ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.
मुव्हीरुट प्रॉडक्सन्सची निर्मिती असलेल्या ‘गौरीशंकर’ या चित्रपटाची निर्मिती विशाल प्रदीप संपत यांनी केली आहे.

आणखी वाचा – रियुनियनचं सेलिब्रेशन अन् उडालेला गोंधळ; ‘चिकी चिकी बुबूम बुम’च्या ट्रेलरची हवा, प्रसाद खांडेकरच्या लेकाची खास एंट्री

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

ऑरेंज प्रॉडक्शन्स चित्रपटाचे सहनिर्माता आहेत. चित्रपटाचे संकल्पना आणि दिग्दर्शन हरेकृष्ण गौडा यांचे आहे. चित्रपटात हरेकृष्ण गौडा, कविता वसानी दक्षिणा राठोड, राहुल जगताप, सुशील भोसले, संकेत कोळंबकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रशांत आणि निशांत यांनी संगीत दिग्दर्शन, रोशन खडगी यांनी छायांकन, संकेत कोळंबकर यांनी गीतलेखन, अमित जावळकर यांनी संकलन, राशिद मेहता यांनी अॅक्शन, अमित चिंचघरकर यांनी कला दिग्दर्शन, मेकअप नितिन दांडेकर, धनश्री साळेकर यांनी वेशभूषेची जबाबदारी निभावली असून कार्यकारी निर्माता म्हणून सिद्धेश आयरे यांनी काम पाहिले आहे.

आणखी वाचा – लग्नाच्या तीन वर्षातच सुप्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट, कारण ऐकून व्हाल थक्क, वयाच्या ४२व्या वर्षी जगतोय असं आयुष्य

असं या चित्रपटाचं आशयसूत्र असल्याचं, कथानक न उलगडता अॅक्शनवर भर देण्यात आल्याचं ट्रेलरमधून समोर आलं आहे. त्याशिवाय उत्तम लोकेशन्सवरचे रोमँटिक प्रसंगही त्यात आहेत. त्यामुळे अत्यंत रांगडं व्यक्तिमत्त्व असलेल्या नायकाच्या आयुष्यात काय घडलं आहे, त्याचा शोध कशा पद्धतीनं घेतो याची उत्सुकता या ट्रेलरनं निर्माण केली आहे. उत्तम दर्जाचे अॅक्शन सिक्वेन्स या ट्रेलरमध्ये दिसतात. त्यामुळे दर्जेदार अॅक्शनपटाची मराठीतील उणीव भरुन निघण्याची मराठी प्रेक्षकांची अपेक्षा वाढली आहे. हा चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Tags: gauri shankarGauri Shankar Movie Trailermarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Chhaava Box Office Collection

'छावा' की 'गदर'?, बॉक्स ऑफिसवर सहाव्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ठरला 'हा' चित्रपट, 'जवान', 'पठाण'लाही टाकलं मागं

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.