बॉलीवूडचे प्रसिद्ध बच्चन कुटुंब सध्या देवदर्शन करण्यात मग्न आहे. बच्चन कुटुंबाचे देवदर्शनाचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. अभिषेक बच्चन, त्याची आई जया आणि बहीण श्वेता यांनी शिवाची नगरी वाराणसी गाठली असून काशी विश्वनाथ बाबांचे दर्शन घेतले आहे. तिघांनीही विधीनुसार पूजा केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी अमिताभ बच्चन कुटुंबासह दिसले नाहीत. अभिषेकही पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्याशिवाय बनारसला पोहोचला होता. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Abhishek bachchan)
जया बच्चन व अभिषेक बच्चन यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली आणि प्रार्थना केली. त्यांच्याबरोबर श्वेता बच्चनही दिसली होती. याआधी नीता अंबानीही काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांनी त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाचे पहिले कार्ड बाबांना देऊ केले. राधिका मर्चंटबरोबर १२ जुलै रोजी अनंतचे लग्न होणार आहे. पाहुण्यांच्या आगमनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रियांका चोप्रा पती निक जोनासबरोबर मुंबईत आली आहे. दुसरीकडे टॉलिवूडमधील राम चरणदेखील पत्नी उपासना आणि मुलगी क्लिन कारासह विमानतळावर पोहोचले.
गेल्या अनेक महिन्यांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत. दोघेही घटस्फोट घेऊ शकतात, अशीही चर्चा सर्वत्र पसरलेली पाहायला मिळाली. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. आणि बहुतेक ऐश्वर्या व अभिषेक त्यांच्या पोस्टद्वारे या अफवा फेटाळून लावतात.
दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अभिषेक ‘बी हॅप्पी’ या चित्रपटात दिसणार आहे. ज्याचे शूटिंग सध्या सुरु आहे. याशिवाय तो शुजित सरकारसह एक चित्रपटही करत आहे, ज्याचे नाव अद्याप ठरलेले नाही. जया बच्चन गेल्या वर्षी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसली होती.